Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Rail : पुणे रेल्वेची धडक कारवाई, महिन्याभरात इतक्या फुकट प्रवाशांना पकडले की आता…

Pune Rail : पुणे रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात विक्रमी प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

Pune Rail : पुणे रेल्वेची धडक कारवाई, महिन्याभरात इतक्या फुकट प्रवाशांना पकडले की आता...
pune raily stationImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 1:29 PM

पुणे | 7 सप्टेंबर 2023 : पुणे औद्योगिक शहर आहे. पुणे शहरात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असतात. यामुळे देशभरातील विविध प्रातांतून पुणे शहरात नागरिक येतात. नागरिकांसाठी रेल्वे प्रवास हा अधिक सोयीचा आहे. पुणे शहरातून देशभरात रेल्वे जातात. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. प्रवाशांना विविध सुविधा देण्याच्या दृष्टिने रेल्वे तयारी करत असताना फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई केली जात आहे. रेल्वेने ऑगस्ट महिन्यात केलेल्या कारवाईची माहिती जारी केली आहे.

किती जणांकडून केला दंड वसूल

पुणे रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. मध्य रेल्वेने पुणे विभागाने ऑगस्ट महिन्यात १९ हजार जणांना विनातिकीट प्रवास करताना पकडले आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 43 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुरु ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

कसा केला आहे दंड

पुणे विभागात ऑगस्ट महिन्यात 19 हजार 101 जणांना विना तिकीट प्रवास करताना पकडले आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 43 लाख 56 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच सामान नेताना निर्धारित तिकीट नव्हते. सामान जास्त असलेल्या 234 जणांकडून 26 हजार रुपये वसूल केले आहे. रेल्वेने प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन केले आहे. मंडळ रेल्वे प्रबंधक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शानाखाली विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे रेल्वेस्थानकावर एआय कॅमेरे

पुणे रेल्वे स्थानकावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय असणारे कॅमेरे बसवण्यात येत आहे. या कॅमेऱ्यांमुळे बेकायदेशीर तिकिटांची विक्री करणाऱ्यांवर २४ तास लक्ष ठेवता येणार आहे. एआय असणारे हे कॅमेर रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर नजर ठेवणार आहे. हे कॅमेरे व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखून अलर्ट करणार आहे. सध्या प्रायोगित पातळीवर हा प्रयोग सुरु आहे. महिन्याभरात त्याचा अहवाल आल्यावर त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा

पुणे रेल्वे स्थानकावर बेकायदेशीर तिकीट विक्री रोखणारा पहिला प्रयोग, सतत 24 तास असे ठेवणार लक्ष