Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Rain: कुणी विजेच्या खांबावर चढतंय, कुणी पावसाचा आनंद घेतंय, कुणी पावसावरूनच रडतंय! पुण्यात नेमकं काय घडतंय?

Pune Rain: गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सात तालुके टॅंकरमुक्त झालेत ज्यात दौंड, इंदापूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे आणि हवेली हे तालुके टँकर मुक्त झालेत.

Pune Rain: कुणी विजेच्या खांबावर चढतंय, कुणी पावसाचा आनंद घेतंय, कुणी पावसावरूनच रडतंय! पुण्यात नेमकं काय घडतंय?
Pune RainImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 10:55 AM

पुणे: पुणे जिल्ह्यात (Pune District) कालपासून जबरदस्त पाऊस पडलाय! मुसळधार पावसामुळे धरणं चांगलीच भरलीत. पावसामुळे धरणं भरलीत, पाण्याच्या टँकरची संख्या कमी झालीये, संपूर्ण पुणे निसर्गरम्य झालंय. याच पावसामुळे नुकसानही तितकंच झालंय. रस्त्यांवर खड्डे पडलेत ज्यामुळे वाहतूक कोंडी होतीये. हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिल्यानं शाळा बंद आहेत. पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आलीये. अतिवृष्टीने (Heavy Rain In Pune) शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सर्वच पर्यटन स्थळांवर प्रशासनाकडून कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलीय. 14 ते 17 जुलै दरम्यान पर्यटन स्थळाच्या (Tourist Places) 1 किलोमीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलीय. दिनांक 14 ते 16 जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. पुढचे 48 तास धोक्याचे सांगितलेले आहेत. बघुयात पुणे जिल्ह्यात आणि परिसरात एकंदर काय परिस्थिती आहे.

  1. सर्वच तालुक्यात अति पावसामुळे नुकसान झाले आहे. जुन महिन्यामध्ये म्हणावा असा पाऊस जिल्ह्यात झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेच होते. जो काही थोडाफार पाऊस झाला, त्याच पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. पीकं उगवली सुद्धा मात्र बळीराजाच्या चेहऱ्यावरील हे समाधान फार काळ टिकू शकलं नाही. पावसाने होत्याचं नव्हत केलं.
  2. पुण्यात सरासरीपेक्षा 26 टक्के अधिक पाऊस पडलाय. तेरा दिवसांतच पुण्यात जुलै महिन्याची सरासरी ओलांडलीये. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सात तालुके टॅंकरमुक्त झालेत ज्यात दौंड, इंदापूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे आणि हवेली हे तालुके टँकर मुक्त झालेत
  3. शिवाय जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या एकूण टॅंकरची संख्या पूर्वीपेक्षा निम्म्याहून कमी झालीये. त्यामुळे पुणेकरांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.
  4. भर पावसाळ्यातही जिल्ह्यातील शिरूर तालुका अद्यापही तहानलेलाच आहे. या तालुक्यात सर्वाधिक 15 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 22 गावे आणि 192 वाड्यांना 29 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु
  5. हे सुद्धा वाचा
  6. संततधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यावर खड्डे तयार झालेत. वाहतुकीची कोंडी सुरु आहे. तात्पुरता उपाय म्हणून अशास्त्रीय पद्धतीनं खड्डे बुजवण्याचा महापालिकेचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. रस्ते खराब झाल्यामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होतायत. खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागतीये.
  7. मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 50.97% टक्के पाणीसाठा झालाय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झालीये. 24 तासात धरण परीक्षेत्रात 144 मिलिमीटर पाऊस पडलाय त्यामुळे तब्बल अवघ्या 12 तासात 7.30% टक्के इतका पाणीसाठ्यात वाढ झाली, यामुळं पाणी कपातीच संकट दूर झालंय. असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.
  8. खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती. पावसाचीच कालपासून विश्रांती असल्याने खडकवासला धरणातून नदी पात्रता करण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. सध्या धरणातून 4 हजार 807 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणात 54 मिमी पावसाची नोंद
  9. कासारसाई धरण 87.71 टक्के भरले असून धरणाच्या तीनही दरवाज्यातून 3200 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. धरण परिसरात आतापर्यंत 534 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली असून सध्या धरणात 14.88 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून,पाऊस असाच सुरू राहिल्यास हा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
  10. सध्या मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे ओढे, नदी दुधडी भरुन वाहत आहे. मावळ तालुक्यातील ब्राम्णोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कागदी होडी बनवून पाण्यात सोडण्याचा आनंद लुटला यातून जलप्रवास हा किती महत्वाचा आहे हे शिक्षकांनी सांगण्याचा प्रयत्न तसेच सध्याच्या मुलांना मोबाईल मधील गेम पेक्षा किती तरी पटीने खेळ आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय.
  11. पुणे मुंबई रेल्वे प्रवास करताना खंडाळा घाट माथ्यावर पावसाची बरसात सुरू आहे. खंडाळा ते मंकीहिल दरम्यान या पावसाने अनेक छोटे मोठे नैसर्गिक धबधबे निर्माण झालेत, जेव्हा तुम्ही रेल्वे गाडीतून प्रवास करताना निसर्गाचा एक वेगळा आनंद रेल्वे प्रवाश्यांना येत आहे. काय ती झाडी काय ते डोंगर काय ती रेल्वे आणि काय ते धबधबे सगळ ओकेच असं आपुसकच तोंडातून शब्द बाहेर आल्याशिवाय राहत नाही
  12. मावळात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे, यामुळं मावळात विजेचा लपंडाव सुरू आहे. मात्र ह्या भर पावसात, आपलं कर्तव्य पार पाडत महावितरणचे कर्मचारी गुलाब करवंदे दिसून येत आहेत. यांनी भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजेच्या लोखंडी खांबावर चढून वीज दुरुस्तीची कामे सुरूच ठेवली आहेत. यामुळं या महावितरण च्या कर्मचाऱ्यांचे मावळात कौतुक होत आहे.

शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेत जमीनीचे मोठे क्षेत्र सध्या पाण्याखाली असून, पीके कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांवर अति पावसाने दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.