Pune Rain : पुण्यातील पावसाबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट, कोणत्या तालुक्यात किती पाऊस जाणून घ्या!
Pune Rain Update : पावसाच्या येण्याने सर्वांना आनंद झाला आहे. आता शेतीकामांना वेग येणार आहे. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला, अशातच हवामान विभागाने पुण्यातील पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे.
पुणे : मान्सूनने महाराष्ट्र व्यापलाय असून राज्यभर पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळे उकाड्याने पिचलेल्यांना दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून लांबलेल्या मान्सूनने शनिवारी दमदार हजेरी लावली. पावसाच्या येण्याने सर्वांना आनंद झाला आहे. आता शेतीकामांना वेग येणार आहे. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला, अशातच हवामान विभागाने पुण्यातील पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे.
पुणे शहरात बुधवारपर्यंत हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर डोंगर माथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता आलेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे मान्सून लांबला गेला होता. आता मान्सूनसाठी सर्व वातावरण पोषक होत असून महाराष्ट्रभर दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
#Pune rains tula 5.30 pm since morning. pic.twitter.com/WRRUrV14dk
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 25, 2023
पुण्यात रविवारी दुपारी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. शहरातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रभर आणि आज सकाळपासून पावसाने पुण्यात विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा शहर अन् परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
नेहमीप्रमाणे काही ठराविक भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं. हवामाना खात्याने कोणत्या तालुक्यांमध्ये किती पाऊस पडणार याबाबतची माहिती दिली आहे. बुधवारपर्यंत हा पाऊस असाच राहणार असल्याने बाहेर पडताना रेनकोट आणि छत्री सोबत ठेवावी.