मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा, कारण…; रामदास आठवलेंची कविता व्हायरल
Ramdas Athwale Poem on PM Narendra Modi Loksabha Election 2024 : रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी राजकारणावर केलेली एक कविता व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून रामदास आठवले यांनी कविता केली आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
पुण्यात झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भटकती आत्मा’चा उल्लेख आपल्या भाषणात केला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केलं आहे. इंडिया आघाडी बिनकमी लढत आहे. राज्यात महाविकास आघाडी केवळ आरोप करत सुटले आहेत. आत्मे असतात. ते भटकत असतात. नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत. दिल्लीत असले तरी त्यांचा आत्मा देशभर आहे. लोकशाही धोक्यात आहेत असं म्हणतात त्यांना माझहे प्रश्न लोकशाही धोक्यात आली असती तर मोदी मत मागायला आले असते का? असं आठवले म्हणाले. रामदास आठवले यांनी यावर कवितादेखील केली आहे.
आठवलेंची कविता
नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा.. कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा… – रामदास आठवले
ते ध्येय आम्ही गाठणार- आठवले
देश संविधान नुसार चालतो ज्यांना हे मान्य नसेल संविधान मान्य नसेल त्यांना आम्ही चलेजव अस सांगत आहोत. मी 17 राज्यांचा दौरा केला आहे. देशात वातावरण आमच्या बाजूने आहे. तामिळनाडूमध्ये देखील NDA च्या जागा निवडून येतील. आमच्या उत्तर भारतात अनेक जागा निवडून येतील. आम्ही नाऱ्यप्रमाणे 400 जागा जिंकू. जनतेचा कौल आम्हाला मान्य असेल. मोदींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात 40 जागा आमच्या नक्की निवडून येतील, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी यांचा आत्मा भटकत आहे. असं संजय राऊत म्हणतात त्यांना उद्धव ठाकरे यांनी केवळ आरोप करण्यासाठी ठेवले आहे. राज्याचा खेळ खंडोबा यांनी केला आहे. जे रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके…, असं म्हणत आठवलेंनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
तरी मी त्यांच्यासोबत- आठवले
पुणे जिल्ह्यातील चारही आणि मुंबईत 6 जागा आम्ही नक्की जिंकू. आम्ही संविधान बिलकुल बदलणार नाही गैरसमज पसरवू नका. मुस्लिम समाजातील लोकांनी देखील NDA ला पाठिंबा द्यावा. मला जरा तिकीट दिल नाही, तरी मी त्यांच्यासोबत आहे. मी राज्यसभेवर आहे. पण आम्हाला एकतरी जागा मिकावी अशी अपेक्षा होती. महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असते. तर नक्की मिळाली असती. आपली राज्यसभा 2026 पर्यंत आहे त्यानंतर देखील मिळेल, असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला.