NEET Success Story : आई न्यूमोनियाने आजारी, मग रिक्षा चालकाच्या मुलाने ठरवलं डॉक्टरच व्हायचं, अन् केली नीट क्रॅक
NEET Success Story : देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालात यश मिळवणारे अनेक 'तारे' आहेत. त्यांनी विपरीत परिस्थितीवर मात करत यशाचा पल्ला गाठला आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील एका युवकाची भर पडली आहे.
पुणे : देशाची माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विकसित भारताचे स्वप्न लाखो युवकांना दाखवले. ते नेहमी मुलांना म्हणत होते, मोठी स्वप्न पाहा अन् ती पूर्ण करण्यासाठी स्वत:ला संपूर्ण झोकून द्या, मग त्यांचा सल्ला ऐकून अनेकांनी यशाला गवसनी घातली. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे. त्यात पुणे येथील एका युवकाने यश मिळवले आहे. असामान्य परिस्थितीत त्याने यशाचे शिखर गाठलंय.
कोणाला मिळाले यश
राज गजानन दामधर हा पाच वर्षांचा होता. त्यावेळी त्याच्या आईला न्यूमोनिया झाला. त्याचे वडील पुणे शहरात रिक्षा चालवत होते. त्यामुळे घराची परिस्थिती सामान्य होती. परंतु त्यावेळी डॉक्टरांनी सपोर्ट केला. त्याच्या आईवर उपचार केले. त्या दुखण्यातून आई बरी झाली अन् राज याच्या मनात डॉक्टर होण्याचे बाळकडू रुजले. नीट परीक्षेत 607 रॅकींग मिळवलेला राज म्हणतो, त्यावेळी मला काही जास्त समजत नव्हते, परंतु सर्वच जण म्हणत होते की डॉक्टरांनी माझ्या आईचे प्राण वाचवले. त्यामुळेच मी डॉक्टर होण्याचे ठरवले.
राज याची कौटुंबिक परिस्थिती सामान्य
राज दामधर याचे मुळगाव बुलढाणा येथील संग्रामपूर आहे. त्याच्या वडीलांनी विज्ञान विषयाची पदवी घेतली. त्यांना शिक्षक व्हायचं होते तर आईने बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. मोठ्या भावाने औषधनिर्माण शास्त्र म्हणजेच डीफार्मसी केले. परंतु गावाकडे वडिलांना रोजगार मिळाला नाही. यामुळे ते पुणे येथील आंबेगाव पठार आले. त्या ठिकाणी राज याचे वडील गेल्या 25 वर्षांपासून रिक्षा चालवत आहेत तर आई अंगणवाडी सेविका आहे. यामुळे घरातील परिस्थिती सामान्य होती.
असा मिळाला प्रवेश
महागडे क्लास लावू शकत नव्हता. तो डॉक्टर डॉ.अभंग प्रभू यांच्या क्लासमध्ये चौकशीसाठी गेला. त्याला ५० हजार रुपये अमानत रक्कम भरण्याचे सांगण्यात आले. परंतु घरची परिस्थिती पाहून ही रक्कम नीट परीक्षा पास होताच परत करणार असल्याचे सांगितले. मग राज याने ही अट मान्य केली. अन् तो नीटच्या तयारीला लागला. आता नीट परीक्षा पास होताच त्याचे ते पैसे पुढील शिक्षणाचा खर्च म्हणून देण्याचा निर्णय डॉ.अभंग प्रभू यांनी जाहीर केला.
हे ही वाचा
शेतात काम केले, कोणताही क्लास लावला नाही अन् मिळवले नीटमध्ये यश