पुणेकरांसाठी मोठी बातमी, वाहतुकीची समस्या सुटणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Pune Ring Road Project : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे रिंग रोडसाठी भूसंपादनही अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पातील नऊ टप्प्यांतील कामाचे कंत्राट बहाल करून पात्र कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत.
Pune Ring Road : पुणे शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आहे. टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्सनुसार वाहतूक कोंडी असणारे पुणे जगातील चौथ्या क्रमांकाचे तर भारतातील तिसरे शहर आहे. परंतु आता पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याचा उपाय करण्यात येणार आहे. पुण्यात रिंग रोड हा वाहतूक कोंडी दूर करण्याचा मोठा उपाय आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून रिंग रोड तीन टप्यासाठी आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहे. एमएसआरडीसीकडून पुण्यात १२६ किमी लांबीच्या रिंगरोड रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
निविदा केली खुली
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे रिंग रोडसाठी भूसंपादनही अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पातील नऊ टप्प्यांतील कामाचे कंत्राट बहाल करून पात्र कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे काम १२ टप्प्यांत होणार असून यापूर्वी नऊ टप्प्यांतील कामासाठी निविदा अंतिम करून कंत्राट बहाल करण्यात आली.आता उर्वरित तीन टप्प्यांतील कामासाठीच्या आर्थिक निविदा सोमवारी खुल्या करण्यात आल्या.
या कंपन्यांची सर्वात कमी बोली
रिंग रोडच्या दोन टप्प्यासाठी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरकडून तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांना कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. आता लवकरच कंत्राट अंतिम केले जाणार आहे.
कसा आहे रिंग रोड प्रकल्प
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करणारा रिंग रोड प्रकल्प खेड, मुळशी, मावळ आणि हवेली या चार तालुक्यातून जात आहे. या चार तालुक्यातील ४४ गावांमधून त्यासाठी जमीन संपादीत केली जात आहे. १५ ते २० किलोमीटरवर हे रिंगरोड असणार आहे. यामुळे बाहेर गावातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना पुणे शहरात येण्याची गरज पडणार नाही. त्यांना रिंगरोडने परस्पर पुणे शहराबाहेरून पुढील प्रवासासाठी जाता येणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक समस्या सुटणार आहे.
हे ही वाचा…
वाहतूक कोंडीत पुण्याचे नाव पोहचले जगभरात, मिळवला हा क्रमांक, मुंबईचा क्रमांक वाचून बसेल धक्का