Pune News : पुणे शहराचा होणार कायापालट, हे १५ रस्ते होणार चकाचक

pune city roads : पुणे शहरातील पायाभूत सुविधा दर्जेदार करण्यावर महानगरपालिकेने भर दिला आहे. यापूर्वी पुण्यात झालेल्या जी २० परिषदेसाठी अनेक कामे करण्यात आली होती. त्या मोहिमेचा पुढील टप्पा आता सुरु होणार आहे.

Pune News : पुणे शहराचा होणार कायापालट, हे १५ रस्ते होणार चकाचक
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 2:53 PM

पुणे | 7 ऑगस्ट 2023 : पुणे शहराचा विकास वेगाने सुरु करण्यात आला आहे. पुणे शहर चौफेर वाढत असताना शहरातील सोयीसुविधा वाढवल्या जात आहेत. पुणे मनपाने शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्याची योजना तयार केली आहे. आता पुण्यातील १५ रस्ते चकाचक करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने प्रक्रिया सुरु केली आहे. या १५ रस्त्यांपैकी नऊ रस्तांचे टेंडर येत्या १५ दिवसांत निघणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत हे रस्ते आदर्श दिसणार आहेत.

कोणती आहेत ती रस्ते

  • नगर रोड
  • सोलापूर रोड
  • मगरपट्टा रोड
  • पाषाण रोड
  • औंध रस्ता
  • बाणेर रोड
  • संगमवाडी रोड
  • विमानतळ व्हीआयपी रोड
  • कर्वे रोड
  • सातारा रोड
  • सिंहगड रोड
  • बिबवेवाडी रोड
  • कोरेगाव पार्क नॉर्थ मुख्य रोड
  • गणेशखिंड रोड
  • सेनापती बापट रोड

काय होणार कामे

  • पंधरा रस्ते आदर्श करण्यासाठी पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे.
  • या रस्त्यांवर दुरुस्ती आणि रंगरंगोटी करुन सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
  • आदर्श असलेल्या रस्त्यांवरीलपाणी, सांडपाणी, सेवा वाहिन्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहे, मग तीन वर्षे त्या रस्त्यांवर खोदाई करता येणार नाही.
  • ही रस्ते कायम स्वच्छ असणार आहे. या ठिकाणी कचरा उचलण्याचे कामे नियमित होणार आहे.
  • या रस्त्यांवर वाहतूक चिन्हे असतील. तसेच दिशादर्शक फलक बसवण्यात येणार आहे.
  • रस्त्यावरील सर्व अनधिकृत फलक काढण्यात येणार आहे.
  • रस्त्यांवर असलेल्या उच्चदाब वीज वाहिन्यांची जागा बदलण्यात येणार आहे.
  • आदर्श रस्त्यांवर देखभाल दुरुस्ती, वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी रोड मार्शलची नेमणूक केली जाणार आहे.

जानेवारी महिन्यात पुणे शहरात जी २० परिषद झाली होती. त्यासाठी देश-विदेशातील प्रतिनिधी झाले होते. या परिषदेच्या निमित्ताने अनेक विकास कामे महानगरपालिकेने केली होती. आता पुन्हा पुणे शहरातील रस्ते सुधारण्यावर महानगरपालिकेने भर दिला आहे. यासाठी आदर्श रस्ते ही योजना सुरु केली आहे. यामुळे पुणे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.