पुणे ग्रामीण जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशात दाहक पदार्थ, शस्त्रे नेणे, सभा, मिरवणुका आणि मोठ्या प्रमाणात जमवणे यांवर बंधने घालण्यात आली आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम १३५ नुसार शिक्षा होईल. शासकीय कर्मचाऱ्यांना वगळून हा आदेश सर्वसामान्यांना लागू आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 6:41 PM

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २७ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल, अशा पद्धतीने कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आणि ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे. त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.