Pune Sassoon | पुणे ससून रुग्णालयातील आरोपी पलायन प्रकरणास या अर्जामुळे ”यू टर्न”

Pune Sassoon | पुणे ससून रुग्णालयातील आरोपी पलायन प्रकरणात आता यू टर्न मिळणार आहे. या प्रकरणी एक अर्ज आला आहे. या अर्जामुळे रुग्णालयातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी रुग्णालयातून आरोपी फरार झाला होता.

Pune Sassoon | पुणे ससून रुग्णालयातील आरोपी पलायन प्रकरणास या अर्जामुळे ''यू टर्न''
Lalit PatilImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 8:34 AM

पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयातून अमली पदार्थांचे रॅकेट सुरु होते. जून महिन्यापासून रुग्णालयात दाखल असलेला आरोपी ललित पाटील अमली पदार्थांचे रॅकेट रुग्णालयातून चालवत होता. या प्रकरणी पोलिसांनी चार दिवसांपूर्वी कारवाई केली होती. पोलिसांनी ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅमचे अमली पदार्थ जप्त केले होते. या ड्रग्सला MD म्हणजेच मेफिड्रोन नावाने ओळखले जाते. त्याची किंमत तब्बल दोन कोटी रुपये आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असताना ललित पाटील रुग्णालयातून फरार झाला.

पोलिसांची निगराणी असताना ललित पाटील फरार

ससून रुग्णालयात कैद्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. ललित पाटील यांच्यावर जून महिन्यापासून या कक्षात उपचार सुरु आहे. त्याच्यावर ज्या आजारांवर उपचार सुरु होते, ते आजार आठ, पंधरा दिवसांच बरे होतात. परंतु त्यानंतरही त्याचा मुक्काम रुग्णालयात होता. कारण या ठिकाणी बसून तो अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवत होता. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. त्यानंतर त्याची चौकशी सुरु होणार होती. परंतु छातीत दुखत असल्याचे सांगत एक्स रे काढण्यासाठी जात असताना तो फरार झाला. त्याची चौकशी होणार असल्यामुळे तो फरार झाला की त्याला फरार करण्यात आले? हा प्रश्न आता चर्चेत येत आहे.

आता आला हा अर्ज

ससून रुग्णालयातील अमली पदार्थ तस्कर प्रकरणी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना आरोपी करा, असा अर्ज न्यायालयात दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड न्यायालयात विशेष सरकारी वकीलाकडून हा अर्ज दाखल झाला आहे. यामुळे रुग्णालयातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

रुग्णालयातील प्रकार उघड

ललित पाटील फरार झाल्यानंतर रुग्णालयाच्या कारभारवर चौफेर टीका होऊ लागली आहे. या ठिकाणी कैदी महिने महिने कसे उपचार घेतात? या प्रकरणात कोणाचे हितसंबध आहेत, असे प्रश्न उपस्थित होऊ लागली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.