Video | रुग्णालयाच्या लिफ्टमध्येच अडकले सहा जण, चौघांना लावावे लागले ऑक्सिजन

Pune News | पुणे येथील ससून हॉस्पिटल सध्या चर्चेत आहे. ललित पाटील प्रकरणामुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. आता पुन्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न निर्माण होणार आहे. रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये सहा जण अडकले. त्यातील चौघांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ऑक्सिजन लावावे लागले.

Video | रुग्णालयाच्या लिफ्टमध्येच अडकले सहा जण, चौघांना लावावे लागले ऑक्सिजन
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 2:13 PM

विनय जगताप, पुणे | 3 नोव्हेंबर 2023 : पुणे येथील ससून रुग्णालयात कैद्यांची चांगलीच बडदास्त ठेवली जाते. ललित पाटील प्रकरणानंतर हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनावर चौफेर टीका होऊ लागली. आता रुग्णालयाच्या लिफ्टमुळे पुन्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्टमध्ये सहा जण अडकल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. पुणे मनापाच्या अग्निशमन दलाकडून सहा जणांची सुटका करण्यात आली. परंतु सहा पैकी चार जणांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

लिफ्ट कापून केली सुटका

ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली होती. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर पुणे मनपाच्या अग्निशमन दलाची कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लिफ्टमध्ये अडकलेल्या ५ पुरुष आणि १ महिलेची सुटका केली. लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांसाठी मनपाला रेस्क्यू करावे लागले. त्यासाठी लिफ्ट कापून काढावी लागली. सुमारे तासभर सहा जण लिफ्टमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना श्वास घेणेही अवघड झाले होते.

चौघांची प्रकृती बिघडली, ऑक्सीजन लावले

लिफ्टमध्ये अडकलेले सहा पैकी 4 जण ससून रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. तसेच दोघे जण उपचारासाठी आलेले नागरिक होते. या सहा पैकी चार जणांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु या प्रकारामुळे ससूनमधील लिफ्टचा धसका सर्वांनी घेतला आहे. या लिफ्टची नियमित तपासणी झाली नव्हती का? यासंदर्भात दोषी कोण आहे? एखादा अनर्थ घडला असता तर कोणाची जबाबदारी राहिली असती? हे सर्व प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. लिफ्टमधील प्रकारामुळे ससून रुग्णालयाचा कारभार पुन्हा दिसून आला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.