पुणे ससून रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन? अन् सर्वच लागले कामाला

| Updated on: Apr 04, 2023 | 12:47 PM

ससून जनरल हॉस्पिटलमधील अधिष्ठातांना एक कॉल अन् धावपळ उडली. तो कॉल मुख्यमंत्री कार्यालयातून आल्याचे सांगितले गेले होते. या प्रकाराबाबत अधिष्ठातांना संशय आला. त्यांनी सरळ मुख्यमंत्री कार्यालयात फोन केला. त्यानंतर हा प्रकार फेक असल्याचे सिद्ध झाले.

पुणे ससून रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन? अन् सर्वच लागले कामाला
ससून हॉस्पिटल
Follow us on

पुणे : मुख्यमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आल्यावर यंत्रणेची धावपळ उडते. सोमवारी संध्याकाळी असाच प्रकार पुणे ससून रुग्णालयात घडला. संध्याकाळी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना लॅण्डलाईनवर फोन आला. फोन करणारा तब्बल पाच मिनिटे बोलत होता. त्याने अधिष्ठातांकडून सर्व माहिती घेतली. मग काही सूचनाही केला. परंतु अधिष्ठातांना संशय आला. मग त्यांनी खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावला अन् सर्व प्रकार उघड झाला. पण हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले नाही.

नेमके काय झाले


बनावट कॉल करून फसवणूक होत असल्याचे प्रकार पुण्यात वाढत आहेत. ससून जनरल हॉस्पिटलमध्ये सोमवारी अशा एका घटनेची नोंद झाली आहे. सोमवारी सायंकाळी 5.30 ची वेळ होती. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयात लँडलाइनवर फोन आला. फोन करणाऱ्याने आपण मुख्यमंत्र्यांचे पीए असल्याचे सांगितले. त्याने पाच ते सहा मिनिटे सर्व माहिती घेतली. सर्वांची पळापळ सुरु झाली. त्या व्यक्तीने मग ससूनच्या आवारातील दोन कँटीन तातडीने बंद करण्याची आदेशवजा सूचना दिली.

मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क

अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना संशय आला. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालतात संपर्क केला. त्यानंतर हा कॉल फेक असल्याचा उलगडा झाला. तत्पूर्वी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी संध्याकाळी कँटीन समितीची बैठक घेतली होती. चार कँटीनच्या निविदेची मुदत संपल्याने ती बंद करणार असल्याबाबत त्यात चर्चा झाली होती.

ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी हा प्रकार फेक कॉल आल्याचे सांगत याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे सांगितले. अशा प्रकरणात वेळ वाया न घालवता त्यापेक्षा रुग्णांच्या शस्त्रक्रिया जास्त महत्त्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.

हे वाचा

पुणे शहरात वाहने वाढली अन् अपघातही, अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूची संख्या मोठी

पुणे शहरात वाहन खरेदीत मोठी वाढ, कोणत्या वाहनांना आहे पुणेकरांची पसंती?