Vande Bharat trains | रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी, आता पुणे स्टेशनवरुन सुटणार वंदे भारत
Vande Bharat trains | कमी कालावधीत लोकप्रिय झालेली वंदे भारत एक्स्प्रेसची दिवाळी भेट प्रवाशांना मिळणार आहे. दिवाळीत नऊ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यातील काही गाड्या महाराष्ट्रातून सोडण्यात येणार आहे. पुण्यावरुन ही गाडी सुटणार आहे.
पुणे | 15 ऑक्टोंबर 2023 : देशात वंदे भारतने (Vande Bharat Train ) एक्स्प्रेस अल्पवधीत लोकप्रिय ठरली. वेगवान असलेल्या या गाडीला सेमी हायस्पीड ट्रेन म्हटले जात आहे. या रेल्वेने भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. यामुळे अनेक राज्यांनी वंदे भारत आपल्या भागातून सुरु करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातून चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. आता दिवाळी दरम्यान आणखी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यातील तीन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून धावणार आहे. पुणे येथूनही वंदे भारत एक्स्प्रेस सुटणार आहे.
पुण्यावरुन कुठे धावणार वंदे भारत
‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात प्रथम गांधीनगर ते मुंबई सुरु झाली. त्यानंतर मुंबई गोवा, मुंबई साईनगर, मुंबई सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. त्यातील मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरुन जाते. परंतु आतापर्यंत पुण्यावरुन सुटणारी एकही वंदे भारत एक्स्प्रेस नाही. आता पुणे ते सिकंदराबाद अशी थेट धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. देशभरात दिवाळीत नऊ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यात पुणे ते सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे.
राज्यास आणखी तीन वंदे भारत
दिवाळीच्या मुहूर्तावर देशात 9 वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यातील 3 वंदे भारत एक्स्प्रेस मध्य रेल्वे विभागात चालवण्यात येणार आहे. त्यात मुंबई ते कोल्हापूर, जालना ते मुंबई आणि पुणे ते सिकंद्राबाद या मार्गांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेच्या एकूण 34 वंदे भारत एक्स्प्रेस संपूर्ण देशात धावत आहेत. ही संख्या लवकरच 200 पर्यंत करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवली आहे. स्वत: नरेंद्र मोदी यांचे लक्ष या हायस्पीड ट्रेनकडे आहे.
देशात पहिली वंदे भारत कोणती
देशात सुरु होणारी पहिली वंदेभारत एक्स्प्रेस वाराणसी ते दिल्ली आहे. त्यानंतर दुसरी दिल्ली ते काटरा ही वंदे भारत सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातून सुरु झालेली मुंबई ते गांधीनगर ही देशातील तिसरी तर राज्यातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे.