Vande Bharat : पुणे शहरातून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार, चाचणी झाली यशस्वी
vande bharat express : मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला चांगले यश मिळाले. सध्या पुण्यातून जाणारी ही एकमेव वंदे भारत एक्स्प्रेस आहे. आता पुण्यावरुन थेट वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे.
पुणे | 25 ऑगस्ट 2023 : भारतीय रेल्वेचा विकासाचा वेग चांगला वाढला आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणावरुन ही गाडी सुरु करण्याची मागणी होत आहे. पुणेकरांसाठी सध्या फक्त मुंबई ते सोलापूर चालणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. परंतु आता ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुणे रेल्वे स्टेशनवरुन थेट सुरु होणाऱ्या आहे. त्यासाठी ट्रॉयल रन घेण्यात आली आहे. आता लवकरच पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेसने थेट दुसऱ्या राज्यापर्यंत जाईल.
अजून दहा वंदे भारत
देशात अजून दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. त्यात राज्याला दोन गाड्या मिळणार आहे. पुणे-सिकंदराबाद आणि नागपूर सिकंदराबाद या दोन गाड्या सुरु होणार आहे. पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस सुरु आहे. त्याऐवजी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यात येणार आहे. यामुळे दोन आयटी सिटी म्हणजे पुणे आणि हैदराबाद एकमेकांशी जोडले जाणार आहे.
शताब्दीच्या जागी वंदे भारत
पुणे-सिकंदराबाद मार्गावर सध्या शताब्दी एक्स्प्रेस सुरु आहे. ही गाडी जवळपास 8.25 तासांचा कालावधी घेते. त्याच्याऐवजी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याची योजना भारतीय रेल्वेने तयार केली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस या मार्गावर सुरु झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी अजून कमी आहे. सिंकदराबाद- नागपूर दरम्यान वंदे भारत सुरु करण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर सात तासांचा प्रवास आहे. परंतु वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यावर ही वेळ कमी होणार आहे. नवीन सुरु होणाऱ्या या गाडीला काजीपेट, रामागुंडम, मनचेरियल, सिरपूर कागजनगर आणि बलारशाह या ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे.
राज्यात होणार सहा वंदे भारत गाड्या
महाराष्ट्रात सध्या मुंबई-सोलापूर, मुंबई गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. आता पुण्यासाठी एक आणि नागपूरसाठी एक गाडी मिळाल्यानंतर राज्यातील वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या सहा होणार आहे.