Pune hit and run case : सर्वात मोठी बातमी, दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद, विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी
आम्हाला 41ची नोटीस दिली नाही. विशाल अग्रवाल फरार नव्हता, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. विशेष म्हणजे विशालला अटक केली तेव्हा तरी नोटीस द्यायला हवी होती, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
पुणे हिट अँड रन प्रकरणातील एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आज सत्र न्यायालायत सुनावणी पार पडली. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशाल अग्रवालसह तिघांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवाल यांच्यसह बार चालक जितेश शेवनी आणि जयेश बोनकर या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
“अल्पवीयन आरोपीला त्याचे वडील विशांत अग्रवाल यांनी पार्टीला परवानगी दिली होती. विशालने आपल्याला मुलाला परवाना नसताना गाडी चालवायला दिली”, असं पोलिसांनी युक्तिवादात म्हटलं आहे. “जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल पुण्यात होता. मात्र विशाल अग्रवाल पुण्यात नसून बाहेर असल्याचं सांगण्यात आलं. फरार विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगरला सापडला”, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.
“गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे. मोबाईलचा तपास करुन जप्त करायचा आहे. त्यामुळे विशालची सात दिवसांची कोठडी देण्यात यावी”, अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली. तसेच “पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. महागड्या गाडीची अजून नोंद नाही”, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.
आरोपीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?
“आम्हाला 41ची नोटीस दिली नाही. विशाल अग्रवाल फरार नव्हता”, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. “विशेष म्हणजे विशालला अटक केली तेव्हा तरी नोटीस द्यायला हवी होती”, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. त्यावर “विशाल अग्रवालला नोटीस देण्यासाठी शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला”, असं पोलिसांनी यावेळी म्हटलं. यावेळी कोर्टाने पब, बार सील केलेत का? असा सवाल कोर्टाने केला.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?
यावेळी सरकारी वकिलांनीदेखील युक्तिवाद केला. “अल्पवयीन आरोपीने कार चालवायला मागितली, असा कारचालकाचा जबाब आहे. आरोपीने कार चालकाला शेजारी बसण्यास सांगितलं. गाडीचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं, मग गाडी रस्त्यावर आलीच कशी?”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.