पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, तीन जणांवर कारवाई

दोन दिवसांपुर्वी पुणे शहरातील कोरेगाव पार्कमध्ये एका स्पा सेंटवर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात दोन एजंटांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी कारवाई आहे.

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, तीन जणांवर कारवाई
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 8:01 AM

पिंपरी चिंचवड : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या या कारवाईत ३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने पिंपळे सौदागरमधील येज लाईन टच दी ब्यूटी या स्पा सेंटरवर धापा टाकला. या छाप्यात वेश्या व्यवसाय (Prostitution) करणाऱ्या ५ महिलांची सुटका करण्यात आली. दोन दिवसांपुर्वी पुणे शहरातील कोरेगाव पार्कमध्ये एका स्पा सेंटवर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात दोन एजंटांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी कारवाई आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात (Pune Crimeगुन्हेगारी वाढली आहे.  पुणे शहरात कोयता गँग व गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत.  पुणे शहरातील काही भागात वेश्याव्यवसाय सुरु आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे व्यवसाय सुरु आहे.

दुसरी कारवाई

हे सुद्धा वाचा

पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर आहे. या भागात आशियाना पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. या सोसायटीतील फेमिना स्पा मध्ये वेश्याव्यवसायवर १५ फेब्रवारी रोजी पोलिसांनी छापा टाकला. त्यात  तीन महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या होत्या. त्यांची सुटका केली. 24, 28 आणि 43 वर्षीय त्या महिला होत्या. या ठिकाणावरुन दोघांना अटक करण्यात आली आहे. नजमूल सुतवली हुसेन (वय 19) आणि रिपुल आलम (वय 19) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

आता पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलिसांनी पिंपळे सौदागरमधील येज लाईन टच दी ब्यूटी या स्पा सेंटरवर धापा टाकला. या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या ५ महिलांची सुटका करण्यात आली. या छाप्यात दोन एजंटांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी कारवाई आहे.

काय असतो स्पा सेंटर

पाश्चात्य देशांमधील स्पा सेंटरचा फंडा गेल्या काही वर्षांपासून भारतात आला आहे. भारतातील अनेक लहान, मोठ्या शहरांमध्ये स्पा सेंटरचे बोर्ड लावलेले दिसतात. या ठिकाणी मसाज केली जाते. स्वीडिश, डिप टिश्यू व ट्रिगर प्वाइंट असे वेगवेगळे अनेक पर्याय देऊन मसाज केली जाते. यामाध्यमातून काही ठिकाणी वेश्याव्यवसाय केला जातो.

शहरात अनेक ठिकाणी सेंटर

शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांनी अशा सेंटर्सवर छापा टाकून कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही स्पा तर निवासी संकुलातही थाटण्यात आल्याचे प्रकार याआधी समोर आले होते. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.