शिरुर लोकसभेच्या जागेवर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा, परंतु शिवसेना उमेदवाराकडून बॅनरबाजी

lok sabha Election 2024 | पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाली असले तरी शिरूर लोकसभेवरचा क्लेम आपण सोडलेला नाही. महायुतीचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार मीच असेल आणि मीच निवडून येणार आहे.

शिरुर लोकसभेच्या जागेवर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा, परंतु शिवसेना उमेदवाराकडून बॅनरबाजी
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 9:30 AM

सुनिल थिगळे, शिरुर, पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु झाली आहे. पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या तिन्ही जागांवर महायुतीचे तिन्ही पक्ष दावा करत आहेत. परंतु बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी यासंदर्भात संकेत दिले. शिरुरमध्ये अजित पवार गटाचे दौरे वाढले आहेत. भाजप आपला दावा ठोकत आहे. या जागेचा तिढा सुटण्याआधीच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बॅनरबाजी बाजी सुरु केली आहे.

जनतेच्या मनात अढळ लागले बॅनर

शिरुरमध्ये ‘जनतेच्या मनात अढळ काल आज आणि उद्या’ अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. शिरूर लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँगेस आणि भाजप आग्रही असताना शिंदे गटाकडून फ्लेक्स बाजी करण्यात येत आहे. अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याचे आव्हान दिले आहे. त्यावेळी शिरूर मतदार संघात उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाजीराव अढळरावर यांच्या बॅनरवर महायुतीतील सर्व नेत्यांचे फोटो लावले आहे. आढळराव यांच्या बॅनरमुळे शिरूर लोकसभा मतदार संघात चर्चा होत आहे.

म्हाडाचे अध्यक्षपद निवड पण दावा कायम

मला मंत्री दर्जाचे पद असावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत होते. त्यामुळे आपल्याकडे म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाली असले तरी शिरूर लोकसभेवरचा क्लेम आपण सोडलेला नाही. महायुतीचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार मीच असेल आणि मीच निवडून येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे म्हाडा नंतर मी लोकसभा निवडणूक लढणार नाही हा गैरसमज आहे.

हे सुद्धा वाचा

पवार कुटुंबियांचे दौरे वाढले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभूत करणारच असे आव्हान दिल्यानंतर अजित पवार यांच्या कुटुंबियांकडूनही शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरे सध्या वाढू लागले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिक्रापूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. खेळ पैठणीचा ही खेळला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी उखाणा ही घेतला.

पार्थ पवार यांना शिरूरच्या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची ही शक्यता आहे. यामुळे मुलाच्या प्रचारासाठीच सुनेत्रा पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरत असल्याचे ही बोललं जात आहे.

हे ही वाचा

बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांचा उमेदवार ठरला ? प्रचाराचा रथ फिरणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.