राष्ट्रवादीचे आ. अशोक पवार यांची संवेदनशीलता, कोरोनाने प्रियजन गमावलेल्या कुटुंबांना फराळ वाटप

कोरोनाने ज्या ज्या कुटुंबांना त्यांच्या आप्तजनांच्या मृत्यूने दुःखाच्या दरीत लोटले, त्या प्रत्येकाच्या घरात यावर्षीची दिवाळीच होणार नाही. ती दुःखीत कुटुंबे शोधून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी यावर्षी त्यांच्या घरात दिवाळीच्या फराळाचे डबे पोचविले आहेत. यासाठी त्यांच्या अर्धांगिनी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रवादीचे आ. अशोक पवार यांची संवेदनशीलता, कोरोनाने प्रियजन गमावलेल्या कुटुंबांना फराळ वाटप
कोरोनाने प्रियजन गमावलेल्या कुटुंबांना आमदार अशोक पवार यांच्याकडून फराळ वाटप
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 1:13 PM

पुणे (शिरुर) : कोरोनामुळे कुटूंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने हिंदू रीतिरिवाजानुसार वर्षभर कोणताही सण साजरा केला जात नाही. मात्र दिवाळीचा सण ‘तमसो मा: ज्योतिर्गमय’प्रमाणे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा असतो. हाच धागा लक्षात घेता आणि दुःखात असलेल्या कुटुंबियांना फराळ आणि संदेशपत्र घरपोच करुन आधार देण्याचा प्रयत्न शिरुरचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आ. अशोक पवार यांची संवेदनशीलता

कोरोनाने ज्या ज्या कुटुंबांना त्यांच्या आप्तजनांच्या मृत्यूने दुःखाच्या दरीत लोटले, त्या प्रत्येकाच्या घरात यावर्षीची दिवाळीच होणार नाही. ती दुःखीत कुटुंबे शोधून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी यावर्षी त्यांच्या घरात दिवाळीच्या फराळाचे डबे पोचविले आहेत. यासाठी त्यांच्या अर्धांगिनी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

1700 कुटुंबापर्यंत पवार कुटुंबीयांनी आतापर्यंत दिवाळी फराळ पोहोचविला

शिरूर हवेली तालुक्यातील 1700 कुटुंबापर्यंत पवार कुटुंबीयांनी आतापर्यंत दिवाळी फराळ पोहोचवण्याचा विधायक उपक्रम सुरू केला आहे. ही संपूर्ण जबाबदारी त्यांच्या अर्धांगिनी सुजाता पवार यांनी घेतली असून आठ दिवसांपासून त्या शिरूर तालुक्यातील 93 गावांसह मतदारसंघातील हवेलीच्या 39 गावांत फराळ वाटप करत फिरत आहेत.

गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या घरात दिवाळी साजरी होणार नाही, याच संवेदनशीलतेचा धागा पकडत आमदार अशोक पवार यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावातील सर्वेक्षण करून, कोरोनामुळे दुःखी झालेली कुटुंबे शोधून काढली व त्या प्रत्येक घरात आणि त्यातील प्रत्येक कुटुंब सदस्यांपर्यंत फराळ पोचविण्यात येत आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडूनही फराळ वाटप

पाच हजार कुटुंबियांना आधार

पुणे शहरात गेल्या वर्षभरात कोरोनाग्रस्त मृत्यूची संख्या जवळपास पाच हजारांच्या आसपास आहे. या सर्व कुटुंबियांना आपण आधार दिला. कोरोनामुळे गेल्या वर्षी मृत्यू झालेल्या जवळपास साडेचार हजार नागरिकांच्या कुटुंबियांना फराळ देऊन कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला होता. यंदाही जवळपास पाच हजार कुटुंबियांना हा आधार देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

संदेशपत्र आणि फराळ पोहोचवला

गेल्या दीड-पावणे दोन वर्षात जवळपास साडेनऊ हजार कुटुंबियांच्या घरी दुःखाचे सावट होते. ज्यांनी कुटुंबियांतील सदस्य गमावले, त्यांचे दुःख कमी होणारे नसले तरी अशा कुटुंबियांना आधार देणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून संदेशपत्र आणि फराळ पोहोचवत आहोत, असं मोहोळ यांनी सांगितलं.

दुःखाचा डोंगर मागे सारुन नवी पहाट

आपल्या हिंदू संस्कृतीत कुटुंबियांतील सदस्य गमावल्यास जवळपास वर्षभर सण साजरा केला जात नाही. मात्र कोरोनाच्या संकट काळात एकूणच नकारात्मक वातावरणात निर्माण होते. या पार्श्वभूमीवर दुःखाचा डोंगर मागे सारुन नवी पहाट अशा कुटुंबियांमध्ये आणणे आवश्यक होते. त्या दृष्टीने प्रयत्न म्हणून कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः काही कुटुंबियांकडे जाऊन आधार देण्याचा प्रयत्न केला असून संपूर्ण पाच हजार कुटुंबियांमध्ये फराळ पोहोच करण्यात येत आहे, असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

(Pune Shirur NCP MLA Ashok Pawar Distributes Diwali Faral to Families who lost members due to COVID19)

हे ही वाचा :

पुणेकरांनी करुन दाखवलं, कोरोनाला हरवून दाखवलं, महापौर मोहोळांची प्रतिक्रिया वाचून सगळ्यांनाच अभिमान वाटेल!

पुणेकरांसाठी गुड न्यूज, एकही कोरोना मृत्यू नाही, 8 महिन्यानंतर पहिल्यांदाचा सुटका

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.