Pune cheating : …अखेर जाळ्यात अडकलाच! सहा कोटींना गंडा घालून झाला होता फरार, पुण्याच्या शिरूर पोलिसांनी आवळल्या सरपंचाच्या मुसक्या

खोटी कागदपत्रे आणि शिक्के वापरून आतापर्यंत सहा कोटी रुपयांना त्याने गंडा घालता आहे. ज्यांची फसवणूक (Cheating) झाली, त्यांनी पोलिसांत त्याच्याविषयी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखले केले.

Pune cheating : ...अखेर जाळ्यात अडकलाच! सहा कोटींना गंडा घालून झाला होता फरार, पुण्याच्या शिरूर पोलिसांनी आवळल्या सरपंचाच्या मुसक्या
पाठलाग करून शिरूर पोलिसांनी अटक केलेला सरपंच अप्पा बेनकेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 1:35 PM

शिरूर, पुणे : सहा कोटींना गंडा घालून फरार झालेला आलेगाव पागाचा सरपंच यास शिरूर पोलिसांनी (Shirur Police) गजाआड केले आहे. अप्पा सीताराम बेनके असे या सरपंचाचे नाव आहे. हा फरार सरपंच गावात येणार असल्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला गजाआड केले आहे. शिरूर तालुक्यातील आलेगाव पागाचा सरपंच आप्पा बेनके (Appa Benke) याच्या विरोधात 2018 ते 2021 यादरम्यान फसवणूक केल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून अप्पा बेनके फरार होता. खोटी कागदपत्रे आणि शिक्के वापरून आतापर्यंत सहा कोटी रुपयांना त्याने गंडा घालता आहे. ज्यांची फसवणूक (Cheating) झाली, त्यांनी पोलिसांत त्याच्याविषयी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखले केले. मात्र तो फरार असल्याने अद्याप त्याच्यावर कारवाई झाली नव्हती.

खोट्या सह्या, सातबारे आणि बरेच काही…

याविषयीची सविस्तर माहिती अशी, की रामचंद्र बेनके, सितारान बेनके, बापूसाहेब बेनके यांच्या शेतजमिनीवर सहा कोटी रुपये कर्ज काढले आणि त्या कर्जसाठी दिलेल्या जमिनीचे 7/12 उताऱ्यावर गावात नेमणूक असलेल्या तलाठी गोरक्षनाथ इंगळे यांच्या नावाची शिक्के तयार केले. तसेच खोट्या सह्या करून सातबारा उतारा, अधिक कर्ज बोजा नोंद त्याची खोटी नोट तयार करून स्वतःच सादर करून प्रथम फसवणूक केली होती. त्याबाबत रितसर फिर्याद दाखल झाली होती. मात्र त्यानंतर तो गायब झाला होता.

हे सुद्धा वाचा

पोलीस उपनिरीक्षक जखमी

फरार असलेला सरपंच अप्पा बेनके हा त्याच्या गावी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित पवार, अंमलदार राजेंद्र गोपाळे, शंकर चव्हाण यांनी मोठ्या शिताफीने त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. या गडबडीत पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांना किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार करीत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.