विद्यार्थ्यांने दरवाजा नॉक केला, शिक्षिकेला आला राग अन् छडी चालली छम् छम्, मग…

| Updated on: Jul 05, 2023 | 10:54 AM

Pune Cirme News : पुणे शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिक्षिकेला राग आला, अन् विद्यार्थ्याला स्टीलच्या छडीने मार बसला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेले. विशेष म्हणजे खासगी क्लॉसमध्ये हा प्रकार घडला.

विद्यार्थ्यांने दरवाजा नॉक केला, शिक्षिकेला आला राग अन् छडी चालली छम् छम्, मग...
Follow us on

पुणे : पुणे शहरातील एका बारा वर्षीय विद्यार्थ्याला छडीचा मार बसला. दरवाजा जोराने नॉक केल्यामुळे त्या मुलास मार बसला. बारा वर्षीय विद्यार्थ्याला स्टीलच्या छडीने मारहाण झाली. त्यामुळे त्याच्या बोटांना दुखापत झाली आहे. या संदर्भात मुलाच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करणार आहे. हा प्रकार पुणे येथील कोथरुडमध्ये एका खासगी कोचिंग क्लासमध्ये घडला.

काय होता प्रकार

पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडला. या प्रकारामुळे प्राध्यकाने कोथरुड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, मुलगा वॉशरूमला गेला होता. परत आल्यावर त्याच्याकडून जोरात दरवाजा ठोठावला गेला. यामुळे महिला शिक्षिका नाराज झाल्यात. त्यांना राग आला. त्यांनी त्या मुलास स्टीलच्या छडीने मारहाण केली. त्यामुळे त्याच्या बोटांच्या स्नायूंमध्ये दुखापत झाली.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 324 आणि 506अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच शिक्षकाविरुद्ध बाल न्याय कायद्याच्या तरतुदी लागू केल्या आहेत. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील म्हणाले की, “महिला शिक्षिका आणि तिचे पती संरक्षण सेवा परीक्षांसंदर्भातील वर्ग चालवतात. त्यांची चौकशी केली जाणार आहे. आम्ही शिक्षिकेचे जबाब नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई करू.

हे सुद्धा वाचा

दरम्यान माध्यमांनी शिक्षिकेशी संपर्क केला असता तिने म्हटले की, माझ्याविरुद्ध झालेल्या पोलिस केसबद्दल मला माहिती नाही. जर असा काही प्रकार झाला असेल तर मी चौकशी करेल. परंतु मारहाण झाल्यासंदर्भात बोलण्यास त्यांनी नकार दिला.