पुणे पारा वाढला, एकीकडे ऊन तापले, दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज

राज्यातील वातावरण वेगळेच तयार झाले आहे. एप्रिलमध्ये पुणे शहराचे तापमान प्रथमच ४० अशांवर गेले आहे. दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे.

पुणे पारा वाढला, एकीकडे ऊन तापले, दुसरीकडे राज्यात पावसाचा अंदाज
तापमान वाढ
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 7:52 AM

योगेश बोरसे, पुणे : एकीकडे राज्यात तापमान वाढत आहे. पुण्यासह इतर अनेक शहरांचे तापमान 40 अशांवर गेले आहे. दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज मुंबई हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान सतत पडणारा पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नाही.

पुणे पारा चाळिशीच्या पार

फेब्रुवारीनंतर प्रथमच पुणे जिल्ह्याचा पारा एप्रिलमध्ये चाळिशीच्या पार गेला आहे. राज्यातील अनेक शहराचे तापमान चाळीस अशांवर गेले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे 40.4 आहे. त्यानंतर सर्वाधिक तापमान शिरूरमध्ये 40.2 अंश नोंदविले गेले. बुधवारी संपूर्ण पुणे जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान 37 ते 40 अंशांवर होते. यंदा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्हा राज्यात बहुतांश वेळा तापमानात आघाडीवर होता.

हे सुद्धा वाचा

पावसाचा अंदाज

राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे तापमान वाढला आहे. पुण्यात बुधवारी ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही ठिकाणी पाऊसही झाला. दरम्यान आगामी चार दिवस संपूर्ण पुणे जिल्ह्यात व राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मंत्रिमंडळाचा दिलासा

“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ‘अतिवृष्टी’ ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासांत 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेती पिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे देखील शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. अशा प्रकरणी शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक आहे.

आता असा असेल निकष

राज्य शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या “अतिवृष्टी” या नैसर्गिक आपत्तीकरिता देखील 24 तासामध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवून याबरोबरच सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या ट्रीगरमधील “सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI)” हा अतिरिक्त निकष शेती पिकांच्या नुकसानीकरिता लागू करण्यात येणार आहे. दुष्काळाव्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी देखील हा निकष लागू राहील.

Non Stop LIVE Update
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.