पुणे | 17 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यापूर्वी मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी काही जणांना अटक केली होती. एनआयएच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादीत असलेले इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे आरोपी होते. या प्रकरणाचा तपास सुरुवातील एटीएसने केला आता एनआयएकडे हा तपास आला आहे. या दोघांचे इसिस असलेले संबंध आधीच उघड झाले होते. या प्रकरणात आरोपी शाहनवाज आलम हा मुख्य सूत्रधार असून तो नामशेष झालेल्या दहशतवादी संघटना सिमी अन् इंडियन मुजाहिदीनला पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करत आहे.
इस्लामिक स्टेट (आयएस) ही दहशवादी संघटना नाही तर अन्य दोन दहशतवादी संघटनांनाही पुन्हा एकत्र आल्या आहेत. स्टुडंट इस्लामिक मुव्हेमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या संघटना पुन्हा सक्रीय होत असल्याची चिन्ह दिसून येत आहे. सुरक्षा संस्थांनी यासंदर्भात माहिती दिली.
राष्ट्रीय तपास संस्थेने ३ जुलै रोजी चार जणांना अटक केली होती. त्यात एक मुंबईतून, दोन ठाण्यातून तर एक पुणे शहरातील होते. हे सर्व जण इसिससाठी काम करत होते. या प्रकरणाचा संबंध हजारीबाग येथील प्रकरणाशी येत आहे. हजारीबाग येथील साकीब नचान हा मुंबईत झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी होता. त्याला दहा वर्षांचा शिक्षा झाली होती. तो या सर्व प्रकरणात महत्वाचा दुवा ठरत आहे.
शाहनवाज आलम हा या प्रकरणात महत्वाचा खिलाडी आहे. ज्या संघटना जवळपास संपल्या होत्या, त्यांना पुन्हा सक्रीय करण्याचे काम तो करत आहे. सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धुळ फेकत त्याने हे काम चालवले होते. परंतु आता तो पकडला गेला आहे.