AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांची रेमडेसिव्हीरची चिंता मिटणार, पाच हजार इंजेक्शन रवाना

राज्यातील कोरोनाच्या मुख्य हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्याने मोठा दिलासा मिळणार आहे (Pune Remdesivir injections Corona outburst)

पुणेकरांची रेमडेसिव्हीरची चिंता मिटणार, पाच हजार इंजेक्शन रवाना
REMDESIVIR
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 2:28 PM

पुणे : पुण्यात आज संध्याकाळपर्यंत (सोमवार 12 एप्रिल) पाच हजार रेमडेसिव्हीर (Remdesivir) इंजेक्शन येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची रेमडेसिव्हीरची चिंता मिटणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने यासंदर्भात माहिती देत पुणेकरांना मोठा दिलासा दिला. रुग्णसंख्येच्या प्रमाणात कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. सध्या पुण्यात जवळपास 70 टक्के रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता आहे. परंतु रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत होण्यास किमान पाच दिवस लागण्याची शक्यता आहे. (Pune to get 5 Thousand Remdesivir injections ahead of Corona outburst)

पुण्यात आरोग्य व्यवस्थाच ‘व्हेंटिलेटर’वर

राज्यातील कोरोनाच्या मुख्य हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. सामान्य लोकांना कोरोना उपचार घ्यायचे झाल्यास आशेचे केंद्र असलेले जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरल्याचे चार दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

पुण्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कालच दोघांना अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सचाही समावेश आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही कारवाई करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ परिसरात एक व्यक्ती रेमडेसिव्हीर इंजेक्शन अधिक किमतीत विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अधिक किमती इंजेक्शन देताना पृथ्वीराज मुळीक याला अटक केली. त्याच्याकडे केलेला अधिक चौकशीत त्याने हे इंजेक्शन त्याची मैत्रीण असलेल्या नीलिमा घोडेकर हिच्याकडून घेतल्याचे सांगितले. नीलिमा ही वाकड येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते.

अजित पवार काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोरोना लसींची जितकी गरज असेल, तितक्या प्रमाणात लसींचा पुरवठा केंद्राकडून करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेडवर जास्त लक्ष द्यावे लागेल. ससूनमध्ये 500 बेड्स देण्याचं नियोजन आहे. कोरोनाची साखळी तोडणं आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यानं एकमेकांवर टोलवाटोलवी न करता एकमेकांना सहकार्य करावं, असंही आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या :

पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा, आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’

रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, पुण्यात नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला बेड्या, मित्रालाही अटक

(Pune to get 5 Thousand Remdesivir injections ahead of Corona outburst)

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.