Pooja Khedkar : IAS प्रोबेशनर पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांचा दणका, काय Action घेतली?

Pooja Khedkar : आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. लाल-निळा दिवा, लेटर पॅड, नेमप्लेट, स्वतंत्र ऑफिस चेंबर आणि स्टाफ या मागण्यांमुळे पूजा खेडकर चर्चेत आल्या. त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप झाला आहे.

Pooja Khedkar : IAS प्रोबेशनर पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांचा दणका, काय Action घेतली?
IAS officer Pooja Khedkar
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 5:01 PM

डॉ. पूजा खेडकर या IAS कशा बनल्या यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आयएएस प्रोबेशनर म्हणून त्यांची नियुक्ती वादाचा विषय ठरली आहे. प्रोबेशनर असताना ऑडी गाडीतून प्रवास, दुसऱ्यांची केबिन बळकावणं, अधिकाऱ्यांना त्रास देणं या वर्तनामुळे डॉ. पूजा खेडकर वादात सापडल्या. आता त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप झाला आहे. एकूणच या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर येतेय. जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे यांनी सविस्तर रिपोर्ट मुख्य सचिवांना पाठवल्यानंतर आता पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशीमला बदली झाली आहे.

पूजा खेडकर यांना आता पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी गाडीवर लाल दिवा लावल्या प्रकरणी 21 हजार रुपये दंडाची कारवाई केली आहे. लाल-निळा दिवा, लेटर पॅड, नेमप्लेट, स्वतंत्र ऑफिस चेंबर आणि स्टाफची पूजा खेडकर यांनी मागणी केली होती. पूजा खेडकर यांचा प्रोबेशनर म्हणून काळ संपलेला नसल्याने त्यांना विशेषाधिकार मिळालेले नाहीत, पण तरीही त्या सतत या मागण्या करत होत्या.

900 ग्रॅम सोने, हिरे, 17 लाख रुपये किंमतीच सोन्याचं घड्याळ

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पूजा खेडकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांकडे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र असून 110 एकर शेतजमीन आहे. ही मालमत्ता म्हणजे शेतजमीन कमाल मर्यादा कायद्याचे उल्लंघन आहे. 1.6 लाख चौरस फुटाची 6 दुकान आहेत. 7 फ्लॅट असून यात हिरानंदानी या पॉश वस्तीत एक फ्लॅट आहे. 900 ग्रॅम सोने, हिरे, 17 लाख रुपये किंमतीच सोन्याचं घड्याळ आहे. 4 कार, दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी आणि एक ऑटोमोबाईल कंपनी आहे. स्वत: पूजाकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याची चौकशी व्हायला नको का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विचारला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.