Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा, मुलाखतीत…

probationary IAS officer Dr Puja Khedkar: दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत त्या आधारे पूजा खेडकर आयएएस झाली. त्यासाठी तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. परंतु सहा वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला.

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा, मुलाखतीत...
IAS officer Pooja Khedkar
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 12:16 PM

IAS Probationer Pooja Khedkar : पुणे येथील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांची बदली झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या. संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत खोट्या प्रमाणपत्राद्वारे पद मिळवल्याचा प्रकार उघड झाला. दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करत त्या आधारे पूजा खेडकर आयएएस झाली. त्यासाठी तिला सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. परंतु सहा वेळा ती हजर राहिली नाही. त्याऐवजी बाहेरुन वैद्यकीय अहवाल दिला. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणाकडून बाहेरचा अहवाल नाकारला होता. त्यानंतर काही घडामोडींमध्ये तो अहवाल स्वीकारला. आता आयएसआय पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तिला मुलाखतीमध्ये महाराष्ट्राशी संबंधित दोन प्रश्न विचारले होते. परंतु त्याची उत्तरे देता आली नाही.

कोणती प्रश्न विचारली

पूजा खेडकर यांना मॉक इंटरव्ह्युमध्ये महाराष्ट्राशी संबंधित 2 प्रश्न विचारले. परंतु या प्रश्नांचीही उत्तर देता आली नाहीत. त्यात एक प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये महिलांच्या गर्भपिशवी काढून टाकण्यात आल्याचा होता. हे प्रकरण राज्यभरात नव्हे तर देशभरात गाजले होते. त्याबद्दल पुजा यांना विचारले असता त्यांनी आपल्याला याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर तिची निवड झाली. यामुळे त्यावर एक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सरकारी नोकरीत असताना कंपनी स्थापन केली

सरकारी नोकरीत असताना पूजा यांनी एका कंपनीची स्थापना केली. पूजा ऍटो नावाची कंपनी त्यांची आहे, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला. या संदर्भात पीएमओ आणि महाराष्ट्र सरकार तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

काय आहे पूजा खेडकर प्रकरण

स्वतंत्र गाडी, बंगला अन् कर्मचारी अवास्तव मागण्या केल्यानंतर प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची राज्य सरकारने उचलबांगडी केली. त्यानंतर तिची प्रकरणे समोर येऊ लागली. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळाल्याचा प्रकार उघड झाला. पूजा खेडकर यांनी केंद्रीय नागरी सेवा आयोगाला सादर केलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांव्यतिरिक्त ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्रात विसंगती आढळल्या. त्यांच्या वडिलांनी अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यात उत्पन्नाचे तपशील समोर आले होते. त्यात ४० कोटींचे उत्पन्न दाखवले. ओबीसी नॉन क्रिमिलेयरसाठी ८ लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. त्यामुळे तिच्या वडिलांची संपत्ती पाहता नॉन क्रिमिलेयरमधील पात्रतेवर प्रश्न निर्माण होत आहे.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.