पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी कोण ठरले पात्र, कधी होणार अंतीम फैसला?

Pune News : पुणे विद्यापीठाचा कुलगुरु कोण होणार? याची उत्सुक्ता राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना लागली आहे. यासाठी २७ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले.

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी कोण ठरले पात्र, कधी होणार अंतीम फैसला?
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 5:02 PM

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरु आहे. देशातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाचा समावेश आहे. या विद्यापीठाचा कुलगुरु होण्यासाठी राज्यभरातून अनेक नामवंत शिक्षणतज्ज्ञांनी आपली नावे दिली आहेत. या पदासाठी एकूण २७ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यात इतर विद्यापीठातील कुलगुरु, प्रकुलगुरु आणि प्रोफसर यांच्यांसह नामवंतांचा समावेश आहे.

कोणाचे अर्ज पात्र ठरले

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उद्धव भोसले, पुणे विद्यापीठाचे विद्यमान प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचे नाव पात्र ठरले आहे. पुणे विद्यापीठातून डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, विज्ञान लेखक आणि नवोपक्रम, नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. संजय ढोले, भौतिकशास्र विभागाचे प्रमुख डॉ. संदेश जाडकर, माजी प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, डॉ. विजय खरे, डॉ. अविनाश कुंभार, डॉ. राजु गच्चे,डॉ. विलास खरात यांचेही नाव आहे.

हे सुद्धा वाचा

जळगाव विद्यापीठातून यांचे अर्ज

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रो. अशोक महाजन, प्रो. एम.एस.पगारे आणि प्रो. बी.व्ही.पवार यांनाही मुलाखतीसाठी बोलवले आहे. तसेच औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डॉ. अशोक चव्हाण आणि डॉ. एम.बी मुळे यांची मुलाखतीसाठी बोलवले आहे. लाणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रा. एस.बी.देवसारकर हे देखील स्पर्धेत आहेत.

मुंबईमधून कोण आहेत

मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉली सनी, प्रा. पी.ए. महानवर, प्रा.संजय देशमुख यांचाही नाव पात्र ठरले आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून प्रा. संजय चव्हाण, प्रा. श्रीकृष्ण महाजन, प्रा. विजय फुलारी यांनी केलेले अर्ज पात्र ठरले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून प्रा. जिपक पानसकर, उमरग्यातील श्री छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्रा. धनंजय माने, नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गणेशचंद्र शिंदे यांनाही मुलाखतीसाठी बोलवले आहे.

कधी होणार मुलाखती

पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या १८ आणि १९ मे रोजी मुलाखती होणार आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी मुंबई) येथे मुलाखती होतील. त्यातून पाच नावे कुलपती म्हणजेच राज्यपालांकडे जाणार आहेत. त्यातील एकाची कुलगुरु म्हणून निवड होणार आहे .

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.