Vasant More | हिंमत असेल तर महापौरांची निवडही जनतेतून करा; वसंत मोरेंंचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

सततच्या प्रभाग रचनेतील बदलावर मनसेचे नेते वसंत मोरे म्हणाले की, कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल. राजकारणाची चीड यायला लागली आहे, हिंमत असेल तर निवडमुकांना सामोरे जा...

Vasant More | हिंमत असेल तर महापौरांची निवडही जनतेतून करा; वसंत मोरेंंचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 9:03 AM

पुणे : राज्यात महापालिकेच्या निवडणूका (Election) तोंडावर आल्या आहेत. मात्र, अजूनही प्रभाग रचनेचा घोळ कायम आहे. महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेत मोठे बदल करून तीन सदस्यीय प्रभाग रचना तर केली होती. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी बंडखोरी राज्यात करून 40 आमदारांना आपल्यासोबत घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर राज्यात आता एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचे सरकार आले असून सरकारने मोठा निर्णय घेत राज्यात पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग असण्याचा मोठा निर्णय घेतलायं. सतत प्रभाग रचनेमध्ये बदल होत असल्याने पुण्याचे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे गट यांच्यावर जोरदार टिका केलीयं.

सततच्या प्रभाग रचनेतील बदलावर मनसेचे नेते वसंत मोरे यांची जोरदार टिका

सततच्या प्रभाग रचनेतील बदलावर मनसेचे नेते वसंत मोरे म्हणाले की, कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल. राजकारणाची चीड यायला लागली आहे, हिंमत असेल तर निवडमुकांना सामोरे जा…प्रत्येकजण सोईने प्रभाग रचना बदलतो आहे…मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात हिंमत असेल तर महापौरांची निवडही जनतेतून करावी, असे म्हणत वसंत मोरेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन केले आहे. पुणे महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना प्रभाग रचनेमध्ये सातत्याने बदल करण्यात येत असल्याने टिका केली जातंय.

हे सुद्धा वाचा

2017 प्रमाणेच प्रभाग रचना ठेवण्याच्या निर्णयामुळे आणखी गोंधळ निर्माण

2017 प्रमाणेच प्रभाग रचना ठेवण्याच्या निर्णयामुळे आणखी गोंधळ निर्माण झालायं. काही इच्छुकांची तयारी पाण्यात गेल्याचे चित्र बघायला मिळते आहे. तर काहींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राजकीय सारीपाटात महापालिका यंत्रणा देखील वैतागली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेप्रमाणे पुणे पालिकेत एकूण 173 वॉर्ड आहेत. त्यापैकी 87 वॉर्ड हे आरक्षित करण्यात आले. यातील अनुसूचित जातींसाठी एकूण 23 वॉर्ड राखीव करण्यात आले. त्यापैकी महिलांसाठी 12 वॉर्ड आरक्षित होते. तर अनुसूचित जमातींसाठी एकूण दोन 2 वॉर्ड राखीव करण्यात आले.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.