Pune News : वाहनचालकांना दंड ४४ कोटी, थकबाकी ३० कोटी, आता पोलिसांनी दिली ही संधी
Pune News : पुणे पोलिसांनी वाहन धारकांना एक संधी दिली आहे. ही संधी दंडाची रक्कम भरण्यासाठी आहे. पुणे पोलिसांनी ४४ कोटी रुपये दंड केला असून त्यातील ३० कोटी रुपये थकबाकी आहे. थकबाकी वाढल्यामुळे ही संधी आहे.
पुणे | 5 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते. एक जानेवारी २०२३ पासून ३१ ऑगस्ट २०२३ अखेर वाहतूक शाखेने सहा लाख ९९ हजार ८७९ वाहनचालकांवर कारवाई केली. या कालावधीत वाहन धारकांना ४४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. परंतु अनेक वाहनचालकांनी अद्याप दंड भरलेला नाही.यामुळे वाहनचालकांकडे ३० कोटी रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी भरता यावे, यासाठी वाहनचालकांना तडजोड करून शुल्क भरता येणार आहे. त्या संधीचा फायदा घेऊन गेल्या सात दिवसांत वाहनचालकांनी १ हजार ७९८ वाहनचालकांनी ४१ लाख रुपयांहून अधिक तडजोड शुल्क भरले आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष आणि सीसीटीव्हीद्वारे कारवाई केली जाते.
खेड तहसीलदारवर निलंबनाची कारवाई
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या तात्कालीन तहसीलदार वैशाली वाघमारे यांचावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खेड तहसीलदार पदावर कार्यरत असताना केलेल्या अनियामितेच्या अनुषंगाने त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता निलंबनाची कारवाई केली आहे. खेडमधील शेतकऱ्यांनी या कारवाईचे स्वागत करत पेढे वाटले.
पुणे गणेशोत्सव मिरवणूक, किती ढोल पथके सहभागी होणार
पुणे येथील गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये ५० ढोल आणि १५ ताशे, ध्वज पथक सहभागी होणार आहे. सर्वच प्रमुख विसर्जन मार्गांवरून ढोल ताशा पथक सहभागी होणार आहे. गणरायाचे अगमन आणि विसर्जनाच्या दिवशी सर्व ढोल ताशा आणि ध्वज पथके मिरवणुकांमध्ये सहभागी होणार आहे.
तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी
पुण्यात नोंदणी महानिरीक्षक पदी तुकाराम मुंढे यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी युवक प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पुणे नोंदणी कार्यालयाचा अनागोंदीने ढिसाळ कारभार झाला आहे. यामुळे तुकाराम मुंढे यांच्या सारख्या सनदी अधिकाऱ्याला ही जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
पुणे महावितरण कर्मचाऱ्याचा खून
पुणे येथील महावितरणच्या तरुण वरिष्ठ तंत्रज्ञचा (टेक्निशियन )धायरी परिसरात खून झाला आहे. रायकर मळा परिसरात त्याचा मृतदेह आढळला. तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून आरोपी फरार झाले आहेत. गोपाळ कैलास मंडवे असे मृताच नाव आहे. खुनाच कारण अद्याप अस्पष्ट आहे.