पुणे | 30 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात विग्नहर्ता गणराया असताना दहा दिवस मोठी दुर्घटना घडली नाही. परंतु गणरायाचे विसर्जन झाले आणि हल्लेखोरांचा हैदौस सुरु झाला. पुणे शहरातील सिंहगड रोडवर विसर्जन मिरवणुकीनंतर निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली. सिंहगड पोलीस रस्त्यावर असलेल्या कॉलिटी लॉजच्या पार्किंगमध्ये खुनाचा थरार रंगला. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा विजय ढुमे याचा निर्घृणपणे शुक्रवारी संध्याकाळी 6:45 वाजता खून झाला. आता या प्रकरणात पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे.
विजय ढुमे (वय -43, रा. सिंहगड रस्ता,पुणे) सिंहगड रस्त्यावरील कॉलिटी लॉजमधून बाहेर पडत असताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर वार केले. हल्लेखोरांना बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सामानांचा वापर खुनासाठी केला. लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडक्याने त्याच्यावर केले गेले. त्यांच्या डोक्यावर मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
गणेश विसर्जन मिरवणुकीतील 29 तासांचा बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचारी थकले होते. त्यानंतर सिंहगड रस्त्यावर खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले. आरोपींना पकडण्यासाठी लागलीच सूत्र हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार ते पाच आरोपी दिसत आहे.
विजय ढुमे हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा होता. त्यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध होते. अनेक जणाबरोबर त्याची उठबस होती. त्याचा खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.