Pune Weather | पुण्यात आज हवामान कोरडे, काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याच्या शक्यता

पुण्यात (Pune) दोन आठवड्यांपासून पावसाने (Pune Rain) दडी मारली आहे. त्यामुळे यंदा पावसाने सरासरीही गाठलेली नाही. आजही पुण्यातलं हवामान (Pune Weather) कोरडं राहील. काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Pune Weather | पुण्यात आज हवामान कोरडे, काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याच्या शक्यता
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 10:49 AM

पुणे : पुण्यात (Pune) दोन आठवड्यांपासून पावसाने (Pune Rain) दडी मारली आहे. त्यामुळे यंदा पावसाने सरासरीही गाठलेली नाही. आजही पुण्यातलं हवामान (Pune Weather) कोरडं राहील. काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. (forecast dry weather in Pune today and occasional showers with thunderstorms in some places)

आज दिवसा पुण्यातचं कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असेल. तर रात्री तापमान 26 अंश सेल्सिअसवर येऊ शकतं. दिवसा शहराच्या काही भागात १ मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसा वाऱ्याचा वेग 24 किमी प्रतितास असेल तर रात्री हा वेग वाढून 37 किमी प्रतितास जाऊ शकतो. रात्रीच्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता नाही.

आजपासून पावसाचा जोर कमी होणार

1 जून ते 22 ऑगस्टदरम्यान राज्यात सरासरी 752.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. सोमवार ते गुरूवारदरम्यान राज्याच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये राज्यातल्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शहरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

शहरात 1 जूनपासून 22 ऑगस्टपर्यंत 382.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत दरवर्षी सरासरी 412.4 मिमी पाऊस पडतो. त्यामुळे यंदा शहरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचं स्पष्ट होत आहे. या आठवड्यात पुणे शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांत शहर आणि परिसरातलं किमान तापमान हे 20 ते 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा

खडकवासला प्रकल्पाच्या मुठा खोऱ्यात 95.11 टक्के म्हणजेच 27.96 टीएमसी पाणीसाठा सध्या आहे. पुणे शहर आणि हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांसाठी खडकवासला धरण महत्वाचं आहे. खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने या भागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या 26 पैकी 11 धरणं शंभर टक्के भरली आहेत. इतर धरणांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे.

इतर बातम्या :

Narayan Rane : मी नॉर्मल माणूस वाटलो काय? आमचं पण वरती सरकार, बघतोच : नारायण राणे

मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही

Nashik | शिवसेनेचा पहिला वार, प्रचंड दगडफेक करत नाशिकमध्ये भाजपचं कार्यालय फोडलं

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.