AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Weekend lockdown guidelines : पुण्यात वीकेंड लॉकडाऊनचे नियम, मेडिकल-दूध वगळता सर्व बंद

पुणे महापालिकेने वीकेंड लॉकडाऊनबाबत (Pune Weekend lockdown guideline) नियमावली जाहीर केली आहे. आज म्हणजेच शुक्रवारी 9 एप्रिल संध्याकाळी 6 पासून ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन असेल.

Pune Weekend lockdown guidelines : पुण्यात वीकेंड लॉकडाऊनचे नियम, मेडिकल-दूध वगळता सर्व बंद
Lockdown
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 6:47 PM

पुणे : पुणे महापालिकेने वीकेंड लॉकडाऊनबाबत (Pune Weekend lockdown guideline) नियमावली जाहीर केली आहे. आज म्हणजेच शुक्रवारी 9 एप्रिल संध्याकाळी 6 पासून ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन असेल. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन नियमावली जाहीर केली.

“आज सायंकाळी 6 पासून पुण्यात कडक लॉकडाऊन असेल. त्यादृष्टीने वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येईल. शुक्रवारी संध्या 6 पासून ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडक निर्बंध असतील. फक्त दूध आणि मेडिकल सुविधा सुरू राहतील. वैद्यकीय आणि अतितातडीच्या कारणास्तव बाहेर पडता येईल. बाहेर पडल्यास पोलिसांकडून खातरजमा होईल”, असं पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं.

पुणे वीकेंड लॉकडाऊनचे नियम

  • लॉकडाऊनच्या काळात परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांन सूट, मात्र हॉलतिकीट आवश्यक
  • शुक्रवार संध्या. ते सोमवारी सकाळ म्हणजे वीकेंड लॉकडाऊनमध्ये मेडिकल, दूध दुकाने सोडून सर्व दुकाने बंद. दूध विक्री दुकाने सकाळी 6 ते 11 पर्यंतच सुरु
  • हॉटेल, रेस्टॉरंट, बार मार्फत घरपोच सेवा सुरु राहील
  • स्वीगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व दिवस प्रवासास परवागनी
  • पुणे मनपा क्षेत्रात घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देणाऱ्यासाठी वैद्यकीय मदतनीस/नर्स यांना सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत प्रवासास मुभा
  • – स्पर्धी परीक्षांमुळे खानावळी/ मेस फक्त पार्सलसाठी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहील.
  • लसीकरण सर्व दिवस सुरु राहील
  • कामगारांच्या राहण्याची सुविधा असेल तर शनिवार-रविवार बांधकाम सुरु ठेवता येईल
  • मनपा क्षेत्रातील चष्मे दुकाने सकाळी 7 ते संध्या 6 वाजेपर्यंत सुरु
  • PMPL बस वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार-रविवार बंद
  • ओला आणि उबेर अत्यावश्यक कारणांसाठी सुरु राहतील

पुण्यात 7 दिवसांचा अंशत: लॉकडाऊन 

दरम्यान, यापूर्वी पुण्यात 3 एप्रिलपासून 7 दिवस अंशता लॉकडाऊन होता.  बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा  सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले.

संबंधित बातम्या 

Pune lockdown update : मोठी बातमी : पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद

'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला.
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट.
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.