पतीची हत्या झाली, स्थानिक पोलिसांचा त्रास, पुण्यातील महिलेने गाठला उत्तर प्रदेश
महिलेची मुले आहेत का? मग मुले आईला का सोडून गेली आहेत? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे. तसेच महिलेचे इतर कोणी नातेवाईक आहेत का? याचाही तपास घेतला जात आहे.
फरेंडा, उत्तर प्रदेश : पुणे शहरातील (Pune Citu) एक महिला उत्तर प्रदेशात पोहचली. फरेंडा येथे असहायपणे भटकत असताना तिला रिक्षा चालकाने पाहिले. तिची चौकशी केली. त्यानंतर तिला धीर देत फरेंडा पोलीस ठाण्यात (Police Staion)नेले. त्या महिलेने पोलिसांसमोर आपबिती सांगितली. पोलिसांनी तिला मदतीचे आश्वासन दिले. परंतु खरी परिस्थिती चौकशीनंतरच समजणार आहे. पतीच्या हत्येनंतर (Crime)पोलिसांचा त्रास सुरु झाला आणि मुलेही सोडून गेल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. महिलेची मुले आहेत का? मग मुले आईला का सोडून गेली आहेत? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे.
नेमकी काय आहे घटना
पुणे शहरातील नऱ्हे परिसरात अशोक आर्य पत्नी रुचासह राहत होते. रुचा हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती अशोक आर्य एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. परंतु त्यांची हत्या झाली. पतीच्या हत्येनंतर मुले सोडून हैदराबादला गेले.
नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्थानिक पोलिसांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तिला आपले उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले. मग तिने पुणे सोडले आणि भटकंती करु लागली. भटकता भटकता ती फरेंडा या शहरात पोहचली. रिक्षा चालकाने तिला पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांनी दिले आश्वासन
रुचा हिची परिस्थिती पाहून फरेंडा पोलिसांनी तिला मदतीचे आश्वासन दिले. तिला विश्वास घेऊन चौकशी केली. तिने घरमालकाचा मोबाईल क्रमांक दिला आहे. पोलिसांनी रुचा हिच्या घरमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु खरी माहिती चौकशीअंतीच समजणार असल्याचे पोलिसानी सांगितले.
महिलेची मुले आहेत का? मग मुले आईला का सोडून गेली आहेत? या प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे. तसेच महिलेचे इतर कोणी नातेवाईक आहेत का? याचाही तपास घेतला जात आहे.