Pune News : पुणे कारागृहात गँगवार, कैद्यांमध्ये तुफान हाणामारी
Pune Cirme News : पुणे शहरातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली. पुण्यात गँगवार कारागृहापर्यंत पोहचले असल्याचे यामुळे स्पष्ट झाले. कारागृहात पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण झाली.
पुणे : पुणे शहरातील कारागृह कैद्यांसाठी सुरक्षीत राहिले नाही का? हा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती येरवडा कारागृहात झाली. या ठिकाणी कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण झाली. या हाणामारी प्रकरणात गालफोडे टोळीचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाल्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमके काय झाले
येरवडा कारागृहात 16 कैदी आपापसात भिडले. या कैद्यांनी पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण केली. या हाणामारीत काही कैदी जखमी झाले आहे. पुणे येथील गालफाडे टोळीतील कैदी जेलमध्ये आक्रमक झाले अन् त्यांनी हाणामारीस सुरवात केली. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यात मारहाणीची घटना
येरवडा कारागृहात एप्रिल महिन्यात कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडण प्रकरणातील कैदी आक्रमक झाले होते. या आरोपींना किशोर विभागात ठेवण्यात आले होते. या विभागात इतरही न्यायालयीन कैदी आहेत. या आरोपींची इतर कैद्यांशी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगाळे याच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. हे कारागृह शिपायांना समजल्यानंतर त्यांनी दोघांना बाजूला नेले. दोघांवर उपचार करण्यात आले होते. कारागृहात वाढत जाणाऱ्या हाणामारीच्या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
कारागृह असते हाऊसफुल
राज्यातलं सर्वात जुनं आणि मोठं कारागृह अशी ओळख असलेलं पुण्यातलं येरवडा मध्यवर्ती कारागृह नेहमी हाऊसफुल्ल असते. येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात आलंले असते. जन्मठेप किंवा इतर दीर्घ शिक्षा झालेल्या कैद्यांना येरवडामध्ये ठेवलं जातं. यामध्ये खून खटल्यात शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल चोरीच्या गुन्ह्यात कैदेत असलेल्यांची संख्या आहे.
ऐतिहासिक महत्व
येरवडा कारागृहाला ऐतिहासिक महत्वसुद्ध आहे. कारण या कारगृहात स्वातंत्रपूर्व काळात महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल आणि मोतीलाल नेहरू यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांना कैदी म्हणून ठेवले होते .निवडणूक जागांच्या आरक्षणावर ऐतिहासिक ‘पुणे करार’ 1932मध्ये येरवडा तुरुंगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला होता. ते ठिकाण तसेच हँगिंग बॅरॅकदेखील या ठिकाणी आहे. पुण्याचे ब्रिटीश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांच्या हत्येप्रकरणी चाफेकर बंधूंना या बराकीत फाशी देण्यात आली होती.