Pune Crim News | मेट्रोमोनियल साइटवरुन तरुणीशी संपर्क, मैत्री केली, पुढे असे काही केले की…
Pune Crim News | पुणे शहरातील एका युवतीची ओळख मेट्रोमोनियल साईटवरुन युवकाशी झाली. दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले. त्यानंतर एकमेकांच्या संपर्कात आले. लग्न करण्याचे त्यांनी ठरवले. पण पुढे असे काही घडले की...
पुणे | 24 सप्टेंबर 2023 : सध्या एकत्र कुटुंबपद्धत फारशी राहिली नाही. यामुळे लग्न जमवण्यासाठी आता वधूवर सूचक मंडळ किंवा मेट्रोमोनियल साइटचा आधार घ्यावा लागत आहे. पुणे शहरातील एका युवतीने आपले प्रोफाईल मराठी शादी डॉट कॉम वर टाकला होता. त्या माध्यमातून तिच्याशी एका तरुणीने संपर्क केला. दोघांची ओळख वाढवली. आधी फोनवर बोलणे सुरु झाले. त्यानंतर सोबत भेटणे सुरु झाले. मग लग्न करण्याचे आश्वासन त्या युवकाने दिला. परंतु घडलेल्या प्रकारानंतर सर्व प्रकार पोलीस ठाण्यात गेला.
काय झाला नेमका प्रकार
पुणे येथील तळेगाव दाभाडेमध्ये राहणाऱ्या आकाश शंकर जगदाळे (वय ३२) याने आपला प्रोफाईल शादी डॉट कॉमवर टाकला होता. त्या साईटवर पुण्यातील एका २९ वर्षीय तरुणीचा प्रोफाईल होता. आकाश याने तिला संपर्क करत लग्न करण्याची तयारी दर्शवली. दोघांमध्ये संवाद वाढू लागला. दोघे पुणे शहरातील असल्यामुळे त्यांच्या भेटी सुरु झाल्या. त्यानंतर आकाश याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले.
काय केले आकाश जगदाळे याने
आकाश जगदाळे याने दिलेल्या लग्नाच्या आमिषानंतर तरुणी त्याच्या अधिकच जास्त संपर्कात आली. तो मोठ, मोठ्या गप्पाही करत होता. मग तिला विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध तयार केले. ती गर्भवती राहिली. आधी गर्भपात कर मग आपण लग्न करु, असे तो सांगू लागला. युवती तयारी झाली नाही. मग तिला शरीर संबंधाचा व्हिडिओ दाखवत व्हायरल करण्याची धमकी दिली आणि गर्भपात करण्यास भाग पाडले.
शेवटी युवतीची पोलिसात धाव
पीडित युवतीला आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिने आकाशविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. सध्या पुणे शहरात युवती आणि महिलांच्या फसवणुकीच्या आणि अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. नुकतेच बोपदेव घाटात एका तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याचे प्रकरण उघड झाले होते.