पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : पुणेकरांच्या प्रत्येक गोष्टींची चर्चा होत असते. मग पुणेरी पाट्या असो की पुणे अमृततुल्य चहा. पुणे किस्सेही सर्वत्र प्रसिद्ध आहेत. पुणे येथील पदार्थांचे स्वाद प्रसिद्ध आहे. खवय्यांमध्ये ती चर्चा असते. अनेक प्रयोग प्रथम पुण्यात झालेले आहेत. आता एका पुणेकरांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. रिक्षा, टॅक्सी, उबेर, ओला काहीच मिळाले नाही. मग त्या तरुणाने जे काही केले, ते या व्हिडिओतून दिसत आहे. या व्हिडिओवर कॉमेंटचा पाऊसही पडला आहे. यामुळे पुन्हा पुणे तेथे काय उणे…असे म्हणावे लागणार आहे.
सार्थक सचदेवा नावाचा हा इंस्ट्रग्रॉम युजरचा हा व्हिडिओ आहे. सार्थकला घरी जाण्यासाठी ओला, उबेर किंवा रिक्षा मिळाली नाही. लिफ्ट मागूनही मिळाली नाही. मग त्याने आपली पुणेकरी आयडीया आणली. अगदी त्याने त्याला हॉवर्ड विद्यापीठातील पास आऊट विद्यार्थ्याची आयडिया असल्याचे म्हटले. सार्थक याने झोमॅटोवरुन आपल्या घरच्या पत्यावर जेवणाची ऑर्डर दिली . त्यानंतर डिलेव्हरी बॉयशी संपर्क केला. त्याने जेवणाच्या पार्सलसोबत मलाही घरी घेऊन जाण्याचे सांगितले.
डिलेव्हरी बॉय जेवणाच्या पार्सलसोबत सार्थक याला घरी घेऊन जाण्यास तयार झाला. काही वेळाने तो सार्थक उभा असलेल्या ठिकाणी पोहचला. मग दोन्ही एकाच गाडीवर बसून सार्थक याच्या घराकडे निघाले. त्याचा व्हिडिओ शूट केला. त्याच्यासोबतच जेवणाचा आनंद घेतला. एक सेल्फी घेतली. त्यानंतर डिलेव्हरी बॉयचे आभार मानत त्याला बाय, बाय केला.
सार्थक याने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ टाकला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडिओवर अनेकांना कॉमेंट दिल्या आहेत. लाईकचा पाऊसही पडला आहे. एका युजरने गरज ही शोधाची जननी असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी सार्थक याच्या आयडीयाचे कौतूक केले. तसेच हा व्हिडिओ शेअर प्रचंड झाला आहे. शेवटी पुणेकरी आयडिया कामाला आल्याचे काही युजरने म्हटले आहे.