पुणेरी पाट्यांमध्ये मस्त ग्रुप अन् त्रस्त ग्रुपमध्ये लढाई जुंपली, सोशल मीडियावर त्या पाट्यांची जोरदार चर्चा, काय म्हटलेय त्या पाट्यांमध्ये…

puneri patya: पुणेरी पाट्यांची देशात, जगात सगळीकडे जोरदार चर्चा होत असते. आजही दोन पुणेरी पाट्या लक्ष वेधून घेत आहेत. पुण्यातील प्रभात रोडवर हिरवाई उद्यानाच्या गेटवर दोन पाट्या लावल्या आहेत. पहिली पाटी मस्त ग्रुपने लावली आहे. दुसरी पाटी त्रस्त ग्रुपने लावली आहे.

पुणेरी पाट्यांमध्ये मस्त ग्रुप अन् त्रस्त ग्रुपमध्ये लढाई जुंपली, सोशल मीडियावर त्या पाट्यांची जोरदार चर्चा, काय म्हटलेय त्या पाट्यांमध्ये...
puneri patya
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 3:30 PM

पुणे शहराची चर्चा देशभरात होत असते. कारण पुणे हे शिक्षणाचे शहर आहे. पुणे हे उद्योगाचे शहर आहे. पुणे हे संस्कृतीचे शहर आहे. पुणेरी लोकांनी जगभरात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. या पुणे शहरातील पुणेरी पाट्या नेहमीच चर्चेच्या असतात. नियम न पाळणाऱ्यांना शब्दांचा मारा पुणेरी पाट्यातून दिला जातो. तसेच सामाजिक विषयाकडे लक्ष वेधले जाते. या पुणेरी पाट्यांमध्ये दोन ग्रुपमध्ये लढाई सुरु झाली आहे. त्या लढाईची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. पुण्यात दोन वेगवेगळ्या पाट्या या दोन्ही ग्रुपने लिहिल्या आहेत. त्यातील मस्त ग्रुपच्या पाटीला त्रस्त ग्रुपने जोरदार उत्तर दिले आहे.

काय आहे त्या पाट्या

पुणेरी पाट्यांची देशात, जगात सगळीकडे जोरदार चर्चा होत असते. आजही दोन पुणेरी पाट्या लक्ष वेधून घेत आहेत. पुण्यातील प्रभात रोडवर हिरवाई उद्यानाच्या गेटवर दोन पाट्या लावल्या आहेत. पहिली पाटी मस्त ग्रुपने लावली आहे. त्या पाटीवर महिलांना उद्देशून लिहीले आहे की, ”महिलांनो असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेने बघता कामा नये ” त्या पाटीला त्रस्त ग्रुपने उत्तर दिले आहे. त्यासाठी मस्त ग्रुपने लावलेल्या पाटी शेजारीच दुसरी पाटी लावली आहे. त्रस्त ग्रुपच्या त्या पाटीत लिहिले आहे की ”मन इतकं निखळ ठेवा की कोणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये.” या दोन्ही पाट्यांची पुण्यात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

कपड्यांचा विषय कसा आला चर्चेत

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात चर्चेत असतात. पुण्यात नुकतेच वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले. त्यात ते म्हणाले की, वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावे. त्यांच्या या विधानानंतर गोंधळ झाला. राज्यभरात संभाजी भिडे यांच्यावर टीका होऊ लागली. त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने झाली.

हे सुद्धा वाचा

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर पुण्यात महिल्यांच्या कपड्यांसंदर्भात चर्चा सुरु झाली. त्या चर्चेतून या पाट्यांचा जन्म झाला आहे. महिलांना कपड्यांबाबत सल्ला देणाऱ्या पुरुषांना महिलांनी पाट्याच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे. त्यात पुणेरी महिलांची पुणेरी स्टाईल दिसून आली आहे.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.