पुणे पुरंदर विमानतळासाठी मोठ्या हालचाली, खासगी उद्योगसमूहाची यासाठी घेणार मदत

Pune News : पुणे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पुणे पुरंदर विमानतळासाठी मोठ्या हालचाली, खासगी उद्योगसमूहाची यासाठी घेणार मदत
purandar airport
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 4:05 PM

पुणे | 26 ऑगस्ट 2023 : पुणे शहराचा विकास झाला. उद्योगासोबत शिक्षणाची नगरी म्हणून पुणे ओळखले जाऊ लागले. पुण्यावरुन आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणारे अनेक जण आहेत. परंतु पुणे शहराला विमानतळ नाही. पुण्यात भारतीय हवाईदलाच्या असलेल्या लोहगाव विमानतळाचा वापर केला जातो. यामुळे पुणे शहरात विमानतळ निर्मिती करण्याची घोषणा अनेकवेळा झाली. परंतु त्यासाठी ठोस निर्णय झाला नाही. आता पुण्यातील पुरंदर विमानतळ निर्मितीसाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सरकार काय करण्याच्या तयारीत

राज्य सरकारकडून पुरंदरमध्ये विमानतळ उभारण्याची घोषणा आठ वर्षांपूर्वी होती. त्यासाठी सात गावांमधील सुमारे २ हजार ८३२ हेक्टर जागा संपादीत करण्यात येणार होती. त्यासाठी केंद्र सरकारसोबत राज्य सरकार, आणि भारतीय विमान प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला. परंतु भूसंपादन झाले नाही. आता विमानतळाच्या भूसंपादनासाठी 5,000 कोटी लागणार आहे. परंतु राज्य सरकार हा पैसा उभारु शकत नाही. यामुळे अदानी उद्योग सूमह हा निधी देणास तयार आहे.

हे सुद्धा वाचा

लवकरच निर्णय घेणार

अदानी समूहासोबत पुरंदर विमानतळाचा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होणार आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचे काम एमआयडीसी किंवा महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलमेंट कंपनीकडून होणार आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या दोन महिन्यात होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

केंद्राने दिली पुन्हा परवानगी दिली

केंद्र सरकारकडून विमानतळाला दिलेली परवानगी रद्द केली होती. त्यामुळे विमानतळाचा प्रश्न पुन्हा रखडला होता. परंतु राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने त्याच जागेवर भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यात चांदणी चौक पुलाचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी अजित पवार यांनी विमानतळाची गरज बोलून दाखवली होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.