क्विक हील फाऊंडेशनने सीएसआर उपक्रमांसह ६४.७८ लाख व्यक्तींच्या जीवनात घडवला बदल; ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ अवॉर्ड्स २०२५’ मध्ये स्वयंसवेकांचा सन्मान
क्लाऊडवर आधारित सिक्युरिटी आणि अद्ययावत मशीन लर्निंगने युक्त उपाययोजनांच्या सध्याच्या पोर्टफोलिओमधून धोके, हल्ले आणि मालवेअरचा प्रवास हल्ला होण्यापूर्वीच थांबवला जातो. त्यामुळे यंत्रणेच्या स्त्रोतांचा वापरही कमी होतो.
पुणे : क्विक हील फाऊंडेशन या क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या सीएसआर शाखेने महाराष्ट्रातील पुणे येथे १२ जानेवारी २०२५ रोजी ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ अवॉर्ड्सच्या २०२५ एडिशनचे आयोजन केले. या प्रतिष्ठित इव्हेण्टमध्ये भारतभरात सायबर सुरक्षा व जागरूकतेला चालना देण्याप्रती समर्पित स्वयंसेवी संस्था, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अपवादात्मक योगदानांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीचे उप-कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार, तसेच क्विक हील येथील ऑपरेशल एक्सलन्सच्या प्रमुख व क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती अनुपमा काटकर यांनी उपस्थिती दाखवून या इव्हेन्टची शोभा वाढवली. तसेच, याप्रसंगी क्विक हीलची लीडरशीप टीम, जसे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलाश काटकर, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल साळवी देखील उपस्थित होते.
‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ उपक्रम तरूणांना नेतृत्व, सादरीकरण व डिजिटल शिक्षणामधील आवश्यक कौशल्यांसह सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करतो, तसेच आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी व्यासपीठ देतो. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रचारित केलेले ‘डिजिटल इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांच्या दृष्टिकोनाशी संलग्न राहत हा उपक्रम वंचित समुदायांना आवश्यक सायबर सुरक्षा ज्ञान देतो. पथनाट्ये, कार्यशाळा व डिजिटल मोहिमा अशा नाविन्यपूर्ण आऊटरीच पद्धतींच्या माध्यमातून हा उपक्रम लाखो व्यक्तींपर्यंत पोहोचला आहे.
१२० हून अधिक संस्थांसह सहयोग केला आहे, ४,६०० हून अधिक सायबर वॉरियर्सना प्रशिक्षण दिले आहे आणि शाळा व कॉलेजमधील ५५.९२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली आहे. ‘अर्न अँड लर्न’ प्रोग्रामअंतर्गत १२ राज्यांमध्ये या उपक्रमाचा विस्तार आणि पथनाट्यांच्या माध्यमातून १३ राज्यांमधील प्रयत्नांमधून या उपक्रमाचा वाढता प्रभाव दिसून येतो. युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (एसडीजी) ४, ५, ८, ९, १० आणि १७ शी संलग्न हा उपक्रम डिजिटल साक्षरता तफावत दूर करण्याप्रती, तसेच जबाबदार ऑनलाइन वर्तणूकीला चालना देण्याप्रती काम करतो.
यंदा, या अवॉर्ड्समध्ये सायबर सुरक्षेला चालना देण्याप्रती अपवादात्मक नेतृत्व व कटिबद्धता दाखवलेले शिक्षक, क्लब अधिकारी आणि संस्थांच्या उल्लेखनीय योगदानांचा सन्मान करण्यात आला. या प्रयत्नांमधून तरूणांना परिवर्तनाचे उत्प्रेरक म्हणून सक्षम करण्याप्रती आणि सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्याप्रती उपक्रमाची विद्यमान समर्पितता दिसून येते. स्वयंसेवी शिक्षकांना विविध श्रेणी अंतर्गत सन्मानित करण्यात आले, जसे बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड, जो भागधारक सहभाग व प्रभावी आऊटरीचला चालना देणाऱ्या दूरदर्शी लीडर्सचा सन्मान करतो आणि बेस्ट टीचर अवॉर्ड, जो विद्यार्थ्यांना अद्वितीय समर्पिततेसह मार्गदर्शन करणाऱ्या समन्वयकांना सन्मानित करतो.
क्लब अधिकाऱ्यांना (विद्यार्थी) त्यांचे नेतृत्व व योगदानांसाठी सन्मानित करण्यात आले, जसे उल्लेखनीय आऊटरीच व सहभागाकरिता बेस्ट परफॉर्मिंग टीम अवॉर्ड, नाविन्यता व प्रभावी नेतृत्वाला चालना देण्याकरिता बेस्ट प्रेसिडण्ट अवॉर्ड आणि प्रभावी सामुदायिक क्रियाकलापांसाठी बेस्ट कम्युनिटी डायरेक्टर अवॉर्ड. तसेच, स्वयंसेवी संस्थांना देखील त्यांच्या योगदानांसाठी सन्मानित करण्यात आले, जसे नुकतेच सामील झालेल्या संस्थांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी बेस्ट न्यू क्लब अवॉर्ड आणि ऑनलाइन व ऑफलाइन प्रयत्नांच्या माध्यमातून समुदायांना शिक्षित करण्यामधील सर्वोत्तमतेसाठी सायबर स्मार्ट क्लब अवॉर्ड. बेस्ट क्लब ओव्हरऑल अवॉर्ड उच्च कामगिरी करणाऱ्या संस्थांना देण्यात आला, ज्यांनी अपवादात्मक नेतृत्व दाखवले आणि त्यांच्या आऊटरीच उपक्रमांमधील अपेक्षांची पूर्तता केली.
याप्रसंगी मत व्यक्त करत क्विक हील फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीमती अनुपमा काटकर म्हणाल्या, “सायबर-सुरक्षित वातावरणाला चालना देण्याचा आमचा प्रवास अधिक प्रबळ होत आहे, जेथे तरूणांचे सक्षमीकरण व विकासाला प्राधान्य दिले जात आहे. आजच्या यशामधून आमच्या सहभागींची समर्पितता, स्थिरता व सर्जनशीलता दिसून येते, जे सायबर-सुरक्षित भारत घडवण्याप्रती कटिबद्ध आपल्या देशाचे भावी लीडर्स आहेत. मला सायबर सुरक्षेचा संदेश प्रसारित करण्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक व संस्थांची अविरत कटिबद्धता पाहताना अत्यंत अभिमान आणि कृतज्ञता वाटत आहे. त्यांचे प्रयत्न व्यक्तींचे संरक्षण करण्यासोबत आपल्या डिजिटल सोसायटीच्या दर्जाला अधिक प्रबळ देखील करतात. सहयोगाने, आम्ही भावी सायबर संरक्षकांना आकार देत आहोत, परिवर्तनाला प्रेरित करत आहोत आणि समुदायांना अधिक सुरक्षित व समृद्ध भविष्यासाठी ज्ञान व आशेसह सक्षम करत आहोत. आम्ही या उपक्रमाला यशस्वी करण्यामध्ये सतत पाठिंबा देण्यासाठी राज्य प्रशासन, स्थानिक पोलीस आणि आमचे प्रतिष्ठित सहयोगी जसे महाराष्ट्र सायबर व उद्योग संस्थांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.”
‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ उपक्रमाव्यतिरिक्त क्विक हील फाऊंडेशनने ‘अर्न अँड लर्न’ आणि ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अशा उपक्रमांच्या माध्यमातून कौशल्य तफावत दूर करत तरूणांचे सक्षमीकरण करण्यामध्ये मोठे प्रयत्न केले आहेत. फाऊंडेशनने आपल्या आरोग्य यान उपक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागांमध्ये प्रगत आरोग्यसेवा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. हा उपक्रम पूर्णपणे सुसज्ज वैद्यकीय व्हॅन्सची सुविधा देतो. तसेच जीवन कौशल्य शिक्षण, शाळांगण समुपदेशन केंद्र, आदिवासी विकास प्रकल्प आणि आरोग्य मनसंपदा अशा आऊटरीच प्रयत्नांनी विशेषत: वंचित प्रांतांमधील तरूणांमध्ये वैयक्तिक विकास व स्वास्थ्याला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
क्विक हील फाऊंडेशन बाबत
क्विक हील फाऊंडेशन ही जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा सीएसआर भाग आहे. कंपनीने ‘सिक्युरिंग फ्युचर्स’च्या प्रवासात एक नवीन मार्ग आखण्यासाठी सिक्युरिटीचे सुलभीकरण करण्याच्या दृष्टीने ३ दशकांहून अधिक काळाच्या अनुभवाचा वापर केला आहे.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी क्षेत्रातील आमचे उपक्रम युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सनी अधोरेखित केलेल्या विकासातील मोठ्या आव्हानांवर काम करतात. शिक्षणाला, रोजगार विस्ताराला चालना देणे, व्यावसायिक प्रशिक्षण व सायबरसुरक्षा जागरूकता यांच्या प्रति असलेल्या प्रयत्नांद्वारे कंपनी या जागतिक अडथळ्यांना नावीन्यपूर्ण व तंत्रज्ञानाधारित उपाययोजना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. क्विक हील फाऊंडेशनने अंमलात आणलेले हे उपक्रम सर्वांसाठी यश आणि सुरक्षा यांच्या वचनासह भविष्याची हमी देण्यासाठी काम करत आहेत.
क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड बाबत
क्विक हील टेक्नॉलॉजीज लि. ही जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना पुरवठादार कंपनी आहे. क्विक हीलचे प्रत्येक उत्पादन उपकरणांच्या आणि विविध व्यासपीठांच्या विविध भागांमध्ये आयटी सुरक्षा व्यवस्थापन सुलभीकृत करण्यासाठी तयार केलेले आहे. त्यांची रचना ग्राहक, छोटे उद्योग, सरकारी आस्थापना आणि कॉर्पोरेट हाऊसेस यांना सुयोग्य ठरण्यासाठी केली गेली आहे. गेल्या जवळपास ३ दशकांच्या कालावधीत कंपनीच्या संशोधन आणि विकासातून संगणक व नेटवर्क सुरक्षा उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.
क्लाऊडवर आधारित सिक्युरिटी आणि अद्ययावत मशीन लर्निंगने युक्त उपाययोजनांच्या सध्याच्या पोर्टफोलिओमधून धोके, हल्ले आणि मालवेअरचा प्रवास हल्ला होण्यापूर्वीच थांबवला जातो. त्यामुळे यंत्रणेच्या स्त्रोतांचा वापरही कमी होतो. सिक्युरिटी सोल्यूशन्स भारतात तयार करण्यात आले आहेत. क्विक हील अँटीव्हायरस सोल्यूशन्स, क्विक हील स्कॅन इंजिन आणि क्विक हीलच्या उत्पादनांची संपूर्ण श्रेणी ही क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेच्या मालकीची बाब आहे. नुकतेच, क्विक हीलने भारतातील पहिले फसवणूक प्रतिबंध सोल्यूशन AntiFraud.AI लाँच केले, जे अँडॉईड, आयओएस व विंडोजसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.quickheal.co.in/