पुण्यात आक्रमक विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रावर राडा ; वाचा संपूर्ण घटना
आयोजकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात न घेता गेट लावून घेतले. विद्यार्थ्यांनी विनंती करूनही आयोजकांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला. त्यानंतर चिडलेल्या विद्यार्थ्यांनी थेट गेटची कडी उघडत थेट आता घुसले. यावेळी गेटवरील सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यार्थ्यांनी त्यांनाही जुमानले नाही.
पुणे- पुण्यातील हडपसर येथे असलेल्या रामटेकडी परिक्षा केंद्रावर विद्यार्थी व आयोजक यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी घडल्याची घटना घडली आहे. केद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (Central teacher eligibility test) ( CTET ) दरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रावर येण्यास विद्यार्थ्यांना येण्यास उशीर झाल्याने आयोजकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला सोडण्यास नकार दिल्याने विद्यार्थी व आयोजक यांच्यामध्ये वादावादी होत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
उशीर झाल्याने गेट केलं बंद परीक्षा दहा वाजता सुरु होणार होती ,मात्र त्यासाठीच्या रिपोर्टींगची वेळसव्वा नऊची देण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांना रिपोर्टींगला पोहचण्यासाठी एक मिनिटाचा उशीर झाला. त्यामुळे आयोजकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात न घेता गेट लावून घेतले. विद्यार्थ्यांनी विनंती करूनही आयोजकांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला. त्यानंतर चिडलेल्या विद्यार्थ्यांनी थेट गेटची कडी उघडत थेट आता घुसले. यावेळी गेटवरील सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यार्थ्यांनी त्यांनाही जुमानले नाही.
आयोजकांकडून कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन
रामटेकडी येथील परीक्षा सेंटरवर आयोजकांनी कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत तब्बल दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकत्रित जमवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी आयोजकांवर करवाई करण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे. सातत्याने विविध परीक्षांच्या वेळापत्रकात होत असलेले बदल बदलत असलेले परीक्षांचे वेळापत्रक यामुळं आधीच विद्यार्थ्यांच्या मनात रोष आहे. यातच पुन्हा परिक्षाच्या दिवशी आयोजकांकडू विद्यार्थ्यांची उशीर झाला म्हणून केली जाणारी अडवणूक यामुळे परीक्षार्थी चिडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर हजर झाले . पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात बसवून ठेवल्याचीही माहिती समोर आली आहे.
किरण माने या सोंगाड्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याचा बोलविता धनी कोण?, चित्रा वाघ संतापल्या