धनगर आंदोलकांनी थेट अंगावरच… राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?; म्हणाले, भंडारा नेहमी…

मी मराठा आरक्षणावर भाष्य करणार नाही. पण आरक्षणाचे जे मुद्दे आहेत त्यावर राजकीय हस्तक्षेपत होत असल्याने त्याचं गांभीर्य संपत आहे. मराठा समाजाच्या भावना इतपर्यंत आदर करतो. पण त्यामागे राहून राजकीय लोक फायदा घेत आहेत. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे.

धनगर आंदोलकांनी थेट अंगावरच... राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?; म्हणाले, भंडारा नेहमी...
radhakrishna vikhe patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 11:30 AM

सोलापूर | 8 सप्टेंबर 2023 : सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आंदोलकांनी भंडारा उधळला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून धनगर समाज आक्रमक झाला आहे. या मागण्यांसाठीच आज धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष्य केलं आहे. विखे पाटील यांनी भेट देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेत असतानाही त्यांच्यावर भंडारा उधळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच आपण या आंदोलकांना माफ केल्याचंही स्पष्ट केलं आहे.

भंडारा हा नेहमी पवित्र असतो. त्यामुळे निश्चितच पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाली त्याचा आनंद आहे. प्रतिकात्मक गोष्टी करण्याची कार्यकर्त्यांची भावना असते. त्यांनी काही वावगं केलं नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. या कार्यकर्त्यांना सुरक्षा रक्षक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सुरक्षा रक्षक आणि भाजप कार्यकर्त्यांची ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. असा अचानक गोंधळ झाल्यावर अशी प्रतिक्रिया उमटत असते. सुरक्षा रक्षक संरक्षणासाठीच असतात. कार्यकर्त्यांनाही त्या क्षणी वाटलं ते केलं, असं विखे पाटील यांनी सांगितलं.

गुन्हे दाखल होणार नाही

ज्या आंदोलकांनी माझ्यावर भंडारा उधळला. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नका. त्यांच्यावर कारवाई करू नका असे आदेश मी दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

परिणाम होणार नाही

भंडारा उधळण्याच्या आणि आंदोलकांना मारहाण होण्याच्या एका घटनेमुळे भाजपवर काही परिणाम होणार नाही. मी निवेदन घेतलं नसतं, त्यांच्या भावनेचा आदर केला नसता आणि त्यांनी आंदोलन केलं असतं तर समजू शकलो असतो. पण मी निवेदन स्वीकारलं होतं. म्हणणं ऐकून घेत होतो. कोणत्या समाजाचा कार्यकर्ता म्हणून मारहाण करण्याचा काही हेतू नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आरक्षणाच्या पलिकडेही काम सुरू

धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुष्कळ निर्णय झाले आहेत. संविधानात ज्या तरतूदी आहे, त्यावर खल सुरू आहेत. धनगर की धनगड यावर मार्ग काढला जात आहे. आरक्षण देण्याबाबत चर्चा आहे. पण त्यांना सर्व सवलती दिल्या आहेत. त्यांना वंचित ठेवलं नाही. नवीन महामंडळ तयार केलं आहे. 10 हजार कोटींचा आऊटलेट दिला आहे. 6 लाख कुटुंबांना शेळ्यामेंढ्यांचं क्लस्टर देणार आहोत. त्यात 75 टक्के अनुदान सरकार देणार आहे. मोठं पाऊल उचललं आहे. केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर थांबलो नाही. त्यापलिकडे जाऊन काम सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तो केवळ फार्स

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दुष्काळी भागाचा दौरा आहे. त्यावर त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांचा दौरा फार्स आहे. त्यांनी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याच्या वल्गना केल्या होत्या. त्या कधीच पूर्ण केल्या नाहीत. तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री होता काय कारवाई केली? शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे आले? बांधावर जाणं, दुष्काळी भागात जाणं हे राजकारण आहे. लोकांना त्यांची भूमिका माहीत आहे. त्यांचा दौरा कोणी गांभीर्याने घेतील असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.