राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार, दोन वेळा समन्स बजावले होते, आता नॉन बेलेबल वॉरंट…काय आहे पुणे कोर्टातील प्रकरण?

rahul gandhi case pune court: राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. सध्या संसदेचे सत्र सुरू आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणी हजर राहता येत नाही, असा युक्तीवाद राहुल गांधी यांच्या वकिलांनी कोर्टात केला.

राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार, दोन वेळा समन्स बजावले होते, आता नॉन बेलेबल वॉरंट...काय आहे पुणे कोर्टातील प्रकरण?
राहुल गांधीं
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 5:27 PM

काँग्रेसचे नेते आणि खासदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन वेळा समन्स बजावल्यानंतर पुणे न्यायालयात राहुल गांधी हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात गैर जमानती अटक वॉरंट काढण्याची मागणी वकील संग्राम कोल्हटकर यांनी पुणे कोर्टात केली. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत पुणे न्यायालयात बदनामी खटला दाखल झाला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीस हजर राहण्याचे समन्स राहुल गांधी यांना बजावण्यात आला होते. मात्र ते हजर राहिले नाही. आता पुढील सुनावणी ही १० जानेवारी होणार आहे.

अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले की, पुढील तारखेला राहुल गांधी हजर राहतील असे सागितले आहे. परंतु त्यालाही आम्ही आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांना दोन वेळा समन्स बजावले होते. आता परत न्यायालयात उपस्थितीत राहिले नाही तर न्यायालय कठोर कारवाई करेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

राहुल गांधी यांनी काय म्हटले होते?

लंडनमधील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केला होता. राहुल गांधी यांच्या मते सावरकरांनी एका पुस्तकात दावा म्हटले होते की सावरकरांच्या पाच – सहा मित्रांनी एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकरांना त्यावेळी आनंद झाला होता.

राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. सध्या संसदेचे सत्र सुरू आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणी हजर राहता येत नाही, असा युक्तीवाद राहुल गांधी यांच्या वकिलांनी कोर्टात केला.

सत्यकी सावरकर यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांना आज उपस्थितीत राहवे म्हणून सांगितले होते. ते आले नाही. ते सगळीकडे फिरत आहेत. सभा घेत आहेत. परंतु न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही. आता पुढच्या सुनावणीला राहुल गांधी आले नाहीत तर अटक वॉरंट निघू शकते.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.