काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या बाळासाहेब दाभेकर यांना थेट राहुल गांधींचा फोन

काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर निवडणूक लढवण्यावर ठाम होते. आता आपण माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु गुरुवारी त्यांच्या उमेदवारीवरुन चक्र फिरली.

काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या बाळासाहेब दाभेकर यांना थेट राहुल गांधींचा फोन
बाळासाहेब दाभेकरImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 2:39 PM

पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीची (Pune by elections) अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपलीय. मात्र आता काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी झालीय. कसब्यातून काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर (Balasaheb dabhekar) यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. आता आपण माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु गुरुवारी त्यांच्या उमेदवारीवरुन चक्र फिरली. त्यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन केला. दोघांमध्ये संवाद झाला. त्यानंतर बाळासाहेब दाभेकर यांनी आपला निर्णय बदलला.

कसब्यातून काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर (Balasaheb dabhekar) यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळी ते म्हणाले, ‘ पक्षाने माझ्यावर अन्याय केला. माझं वय ६० वर्ष, ४० वर्षे मी पक्षासाठी काम केलं, मग आता लढणार नाही तर कधी? काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांच माझ्याशी बोलणं झालं नाही.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला होता पण मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. मी कसबा पोटनिवडणूक लढवणारच आहे. आता मी माघार घेणार नाही. आता मी काँग्रेस भावनातही जाणार नाही. हा निर्णय मी पक्षाला देखील कळवला आहे’.

हे सुद्धा वाचा

अशी झाली नाराजी दूर

गुरुवारी बाळासाहेब दाभेकर यांना राहुल गांधी यांचा फोन आला. त्यानंतर त्यांनी माघार घेतली. बाळासाहेब दाभेकर म्हणाले की, माझी अनेकांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी निवडणूक लढवण्यावर ठाम होतो. मात्र राहुल गांधींच्या फोननंतर मी तयार झालो. राहुल गांधी यांनी माझी नाराजी दूर केली आहे. आता मी पक्षावर नाराज नाही. उमेदवारी अर्ज मी मागे घेणार आहे.

काँग्रेसला दिलासा

कसबा पेठ मतदार संघातून रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे बाळासाहेब दाभेकर पक्षावर नाराज झाले. त्यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जामुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होणार होती. परंतु आता त्यांनी माघार घेतल्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.

रवींद्र धंगेकर यांचा गौप्यस्फोट

कसबा पेठेचे काँग्रेस रवींद्र धंगेकर यांनी मोठ्या उत्साहात प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस अंतर्गत गटबाजी मोडून काढण्यात त्यांना यश आलंय. फक्त काँग्रेसच नव्हे तर भाजप आणि मनसेतही माझे मित्र आहेत. या निवडणुकीत भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांचीही मला साथ आहे, असा गौप्यस्फोट रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.