वानवडी पाठोपाठ कोंढवा बुद्रुकमधल्या पनीर कारखान्यावर छापा; 22 लाखांहून अधिक किंमतीचा साठा जप्त करत केला नष्ट

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि आयुक्त परिमलसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील सहायक आयुक्त रुपाली खामणे, अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगपात आणि सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

वानवडी पाठोपाठ कोंढवा बुद्रुकमधल्या पनीर कारखान्यावर छापा; 22 लाखांहून अधिक किंमतीचा साठा जप्त करत केला नष्ट
बनावट पनीर जप्त करून नष्ट करताना अन्न आणि औषध प्रशासनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 5:20 PM

पुणे : वानवडी पाठोपाठ कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budruk) येथील पनीर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने (Food and Drug Administration) कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे. सद्गुरू कृपा मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी 22 लाख 65 हजार रुपये किंमतीचा बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामोलिन तेल आदी साठा जप्त करण्यात आला आहे. 5 सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे. कारखान्यावर छापा (Raid) टाकला असता अस्वच्छ परिस्थितीत दूध पावडर आणि पामोलिन तेलाचा वापर करून बनवलेले बनावट पनीर तसेच स्किम्ड मिल्क पावडर व पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. दरम्यान, सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई

साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेत किंमत 2 लाख 39 हजार 800 रूपये किंमतीचे 1 हजार 199 किलो पनीर, 18 लाख 71 हजार 652 रूपये किंमतीचे 4 हजार 73 किलो स्किम्ड मिल्क पावडर, 1 लाख 53 हजार 675 रूपये किंमतीचे 1 हजार 48 किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण 22 लाख 65 हजार 217 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. घेतलेले नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासनाने सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘…तर नागरिकांनी तक्रार करावी’

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि आयुक्त परिमलसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील सहायक आयुक्त रुपाली खामणे, अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगपात आणि सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करून कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.