Pune News | गणेशोत्सवामुळे प्रवाशांची गर्दी, पुणे शहरातून जाणार या विशेष रेल्वे
Pune Railway News | पुणे रेल्वे स्थानकावरुन गणेश उत्सवासाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे पुणे ते कोकण असा प्रवास आरामदायी होणार आहे. तसेच मध्य रेल्वेकडून विशेष गाडी सोडली जाणार आहे.
पुणे | 19 सप्टेंबर 2023 : राज्यात आज सर्वत्र गणरायाचे आगमन झाले. गणपतीसाठी अनेक जण गावी जातात. कोकणातील चाकरमाने गावी जाऊन उत्सव साजरा करतात. यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी होते. आता पुण्यावरुन जाणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी रेल्वेने दिली आहे. रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. पुणे येथून कोकणसाठी विशेष गाडी सुरु होत असताना मध्य रेल्वेकडून स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
कोकणासाठी कधी असणार रेल्वे
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यातील पहिली रेल्वे शनिवारी १७ सप्टेंबर रोजी एक ट्रेन कोकणकडे रवाना झाली. आता 22 आणि 29 रोजी पुण्यातून कोकणात रेल्वे सोडण्यात येणार आहे. तसेच कोकणातून परत येण्यासाठी गाड्या सोडण्यात येणार आहे. आता 24 सप्टेंबर तसेच 1 ऑक्टोंबरला कोकणातून पुण्याकडे येण्यासाठी विशेष गाडी असणार आहे.
ही विशेष रेल्वे
मध्य रेल्वेने मुंबई आणि पुणे शहरातून जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश उत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई- कोल्हापूर (01099 CSMT-Kolhapur express) ही गाडी सोडण्यात येत आहे. 23 सप्टेंबर रोजी ही गाडी सोडली जाणार आहे. मुंबईवरुन ही गाडी रात्री 12.30 वाजता सुटणार आहे. कोल्हापूरला सकाळी 11.30 वाजता पोहचणार आहे.
कुठे असणार थांबा
मुंबई- कोल्हापूर या विशेष गाडीला दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. एकूण 24 डब्यांची ही गाडी असून त्यात 12 कोच शयनश्रेणीचे आहे. सध्या कोकणासह राज्यातील इतर भागांत जाणाऱ्या प्रवाश्यांची गर्दी बसेला होत आहे. तसेच रेल्वेतही अनेकांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. यामुळे या विशेष रेल्वेचा प्रवाशांना फायदा होणार आहे. मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या रेल्वेसाठी 1 लाख 4 हजार गणेश भक्तांची तिकीट एक कन्फर्म झाले आहे.