Rain Update | राज्यात पुढील दोन दिवस पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अन् यलो अलर्ट

monsoon rain update | सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होत आहे. अजून राज्यात दोन दिवस पाऊस असणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहरात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.

Rain Update | राज्यात पुढील दोन दिवस पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अन् यलो अलर्ट
rainImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 9:00 AM

पुणे | 29 सप्टेंबर 2023 : यंदा राज्यात मान्सून उशिराने म्हणजेच २५ जून रोजी दाखल झाला. उशिराने आलेला मान्सून जुलै महिन्यात चांगलाच बरसला. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत असताना ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. तब्बल २० ते २५ दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात पावसाला सुरुवात झाली. राज्यात गणरायाच्या आगमन होत असताना पाऊस झाला तर अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत पाऊस आला. पुणे शहरात विसर्जन मिरवणूक सुरु असताना मुसळधार पाऊस कोसळला.

राज्यात पुढील दोन दिवस पाऊस

राज्यात पुढील दोन दिवस पाऊस असणार आहे. दोन दिवस राज्यातील सर्वच भागांत पावसाचा जोर असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दोन दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागांत पावसाचा अलर्ट दिला आहे. शुक्रवारी वर्धा, बुलढाणा, अकोला, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात मध्य स्वरुपाच्या पावसाचा शक्यता काही ठिकाणी आहे. या भागांत पावसाचा कोणताही अलर्ट दिला नाही. परंतु उर्वरित सर्व जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

पुणे शहरात विसर्जन मिरवणुकीत पाऊस

राज्यात दोन दिवसांपासून काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पुणे आणि मुंबईत विसर्जन मिरवणूक सुरु असताना जोरदार पाऊस झाला. पुणे शहरातील सिंहगड, कोथरुड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी, वारजे, माळवाडी या भागांत जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक सोसायट्या, घरांच्या आवारात पाणी घुसले. महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी विसर्जन मिरवणूक सोडून या भागांत धाव घेतली. संध्याकाळी या भागांत पाऊस सुरु झाला तेव्हा आयुक्त टिळक चौकात मानाच्या गणपतीचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. परंतु पावसामुळे ते घटनास्थळी रवाना झाले.

हे सुद्धा वाचा

बारामतीमध्ये जोरदार पाऊस

बारामतीमध्ये गुरुवारी गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना मुसळधार पावसाने हजेरी लावली. भर पावसात मिरवणुका सुरू होत्या. पावसामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नांदेड जिल्ह्यातील नरसी परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुख्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

Non Stop LIVE Update
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.