Rain Update : कोकणासह राज्यभरात आज यलो अलर्ट, गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट, पुणे परिसरात मुसळधार

24 तासात कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. फोंडा 186, माथेरान 116, दोंडामार्ग ९४, दाबोलीम 87, तर कर्जत 80 मिमी पावसाची नोंद झाली. अन्यत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस झालाय.  सतर्कतेचाही इशाराही देण्यात आलाय.

Rain Update : कोकणासह राज्यभरात आज यलो अलर्ट, गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट, पुणे परिसरात मुसळधार
पावसाच्या सरीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 8:44 AM

पुणे : कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय. गडचिरोली, गोंदिया येथे रेड अलर्ट दिला आहे. पुणे (Pune), सातारा (Satara), कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही (Rain Update) दिला आहे. गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. गेल्या 24 तासात कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. फोंडा 186, माथेरान 116, दोंडामार्ग ९४, दाबोलीम 87, तर कर्जत 80 मिमी पावसाची नोंद झाली. अन्यत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात इगतपुरी 128, लोणावळा 116, महाबळेश्वर 107, आजरा 98, राधानगरी 85, गगनबावडा 66, शाहुवाडी 52, तर वेल्हेत 48 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावरील शिरगाव 168, कोयना 162, दावडी 138, अम्बोणे 112 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हायलाईट्स

  • मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता
  • विदर्भात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट
  • अन्य जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पासाची शक्यता

राज्यातील चित्र

गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या द्रोणीय स्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे कोकणातील बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हायत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक परिसरातील घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कुठे किती पाऊस?

  • इगतपुरी 128
  • लोणावळा 116
  • महाबळेश्वर 107
  • आजरा 98
  • राधानगरी 85
  • गगनबावडा 66
  • शाहुवाडी 52
  • वेल्हेत 48 मिमी
  • घाटमाथ्यावरील शिरगाव 168
  • कोयना 162
  • दावडी 138
  • अम्बोणे 112 मिमी

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पासाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.

हे सुद्धा वाचा

गडचिरोली, गोंदिया येथे रेड अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही दिला आहे. गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.