Rain : आयएमडीने आज कुठे दिला रेड अलर्ट, राज्यात दोन दिवसांत किती टक्के झाला पाऊस

Rain News : राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. शुक्रवारी हवामान विभागाने काही ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे.

Rain : आयएमडीने आज कुठे दिला रेड अलर्ट, राज्यात दोन दिवसांत किती टक्के झाला पाऊस
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 8:04 AM

पुणे | 21 जुलै 2023 : राज्यभरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये नदी नाल्यांना पूर आला आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळली. त्या घटनेत जीवितहानी झाली. पाऊस अजून राज्यात काही दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अन् यलो अलर्ट दिला आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास महत्वाचे आहे. राज्य शासनाने आपात्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा तयार ठेवली आहे.

कुठे कोणता अलर्ट

  • रेड अलर्ट : पुणे , पालघर , ठाणे ,रायगड , अतिमुसळधार पावसाचा अलर्ट
  • आँरेज अलर्ट : मुंबई , रत्नागिरी
  • यलो अलर्ट : सिंधुदुर्ग , सातारा , नाशिक , नंदुरबार , कोल्हापूर ,भंडारा , अकोला , अमरावती , बुलढाणा , चंद्रपूर , गडचिरोली

रत्नागिरीला पावसाचा तडाखा

रत्नागिरी जिल्ह्यास पावसाचा चांगला तडाखा बसला आहे. चिपळूण आणि खेडमध्ये 48 तासांत तब्बल 327 मिलीमाटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी कायम आहे. उतर रत्नागिरीत भागात पावसाचा तडाखा जास्त आहे. पालघर जिल्ह्यास रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. 19 जुलै पर्यंत राज्यात केवळ ५८ टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील धरणसाठा आता ३७ टक्क्यांवर गेला आहे.

हे सुद्धा वाचा

तिसऱ्या दिवशी महामार्ग पाण्याखाली

वसईवरुन वसई फाटा महामार्गाकडे जाणारा मुख्य रस्ता तिसऱ्या दिवशी ही पाण्याखालीच आहे. या भागात रात्रभर रिमझिम पाऊस सुरु आहे. अधूनमधून जोरदार पाऊस झाला आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले आहे. विरार पश्चिम विवा कॉलेज रस्ता, आगाशी स्टेशन रोड रस्ता, नालासोपारा सेन्ट्रल पार्क, स्टेशन रोड, आचोळा, वसई सनसिटी, वसई मुख्य रस्ता, एव्हरसाईन रस्ता हे तिसऱ्या दिवशी ही पाण्याखालीच गेलेले आहे.

जळगावात सातपुडा रांगेत मुसळधार

जळगाव जिल्ह्यात सातपुडा रांगेत नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रावेर शहरासह तालुक्यातील विवरे, भोकरी पाहणी केली. नद्यांना पूर आल्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना एनडीआरएफ अन् एसडी आरएफच्या टीमला जिल्हाधिकारींनी दिल्या आहेत. एनडीआरएफची एक तर एसडीआरएफच्या दोन टीम रावेरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.