Maharashtra Rain | गणरायाच्या आगमनासोबत येणार पाऊस, पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Forecast | राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. गेल्या तीन, चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पाऊस होत आहे. आता गणरायाच्या आगमनासोबत पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

Maharashtra Rain  | गणरायाच्या आगमनासोबत येणार पाऊस,  पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता
Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 8:00 AM

पुणे | 18 सप्टेंबर 2023 : गणरायाचे आगमन मंगळवारी होणार आहे. सर्वत्र श्रीच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरु आहे. राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरु असताना गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. मंगळवारी गणरायाच्या आगमन होत असताना पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे शहर, मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मंगळवारी पाऊस असणार आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता आहे.

कसा असणार पुढील पाच दिवस पाऊस

राज्यात पुढील पाच दिवस पाऊस कायम असणार आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागात मध्यम पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. परंतु या दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याची तीव्रता आता कमी झाली आहे. आता आग्नेय राजस्थान आणि पश्‍चिम मध्य प्रदेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही.

रविवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

रविवार राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नंदुरबार, नाशिक आणि धुळे जिल्ह्यासाठी अलर्ट दिला गेला होता. आता सोमवार नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. धुळे, रायगड, पालघर, पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे.

हे सुद्धा वाचा

धरणातून पाण्याचा विसर्ग

नाशिक शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणातून ५३७ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील तापी नदीला पूर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे आष्टी चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे. तसेच चामोर्शीत मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढल्याने गडचिरोली जिल्ह्यातील चार मार्ग बंद झाले आहेत.

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.