Rajgurunagar Bus Stand : पावसाच्या डबक्यातलं राजगुरूनगरचं बस स्टॅन्ड! आगाराची डागडुजी, रस्त्यावरचे खड्डे मात्र जैसे थे..!

राजगुरूनगर हे तालुक्याचे ठिकाण आहे. यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुणे शहरात नोकरीनिमित्त अनेक नागरिक एसटी बसने प्रवास करत आहेत. यामुळे बस स्थानकात हजारो प्रवासी रोज येत असतात. त्यांनाही मोठ्या प्रमाणत हा त्रास सहन करावा लागत आहे.

Rajgurunagar Bus Stand : पावसाच्या डबक्यातलं राजगुरूनगरचं बस स्टॅन्ड! आगाराची डागडुजी, रस्त्यावरचे खड्डे मात्र जैसे थे..!
राजगुरूनगर बस स्थानकातील खड्ड्यांत साचलेले पावसाचे पाणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 2:35 PM

राजगुरूनगर, पुणे : पुण्यातील राजगुरूनगर एसटी बस आगारात (Rajgurunagar Bus Stand) पहिल्याच पावसात पाण्याची मोठमोठी डबकी साचली आहेत. त्यामुळे या डबक्यातील साचलेले खराब पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. गेले कित्तेक दिवस आगारात मोठमोठे खड्डे (Pothole)पडले आहेत आणि ते न भरल्याने आता या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे. प्रवाशांसोबत बस चालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणाऱ्या या मार्गावरील राजगुरूनगर एस टी बस आगार हे एक महत्त्वाचे बस स्थानक आहे. मात्र गेल्या कित्तेक दिवसांपासून या आगारात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये आता पावसाचे पाणी (Rain water) साचत आहे. या ठिकाणी येणाऱ्या बस या खड्ड्यांतून जात असताना अनेक प्रवाशांच्या अंगावर खराब आणि गढूळ मैलापाणी उडत आहे.

आगार व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

राजगुरूनगर हे तालुक्याचे ठिकाण आहे. यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुणे शहरात नोकरीनिमित्त अनेक नागरिक एसटी बसने प्रवास करत आहेत. यामुळे बस स्थानकात हजारो प्रवासी रोज येत असतात. त्यांनाही मोठ्या प्रमाणत हा त्रास सहन करावा लागत आहे. राजगुरूनगर आगार व्यवस्थापन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे आगाराने आधीच करायला हवी होती. मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने पुढील काही महिने त्रास सहन करावा लागणार असल्याचे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले आहे.

राजगुरूनगर बस स्थानकाची अवस्था

हे सुद्धा वाचा

प्रवाशांसह चालकांना मनस्ताप

दोन वर्षापूर्वी राजगुरूनगर आगाराची डागडुजी करण्यात आली. यामध्ये बस आगारात असलेले फलाट, बैठक व्यवस्था रंगरंगोटी करण्यात आली. मात्र आगारात असलेले खड्डे भरण्यात आले नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून हे खड्डे जैसे थे अस्वस्थेत आहेत. याचा सामना बसच्या चालकांनाही करावा लागत आहे. बस खड्यातून जात असल्याने बसमधील प्रवासी बस आपटल्याने तर बस बाहेरील प्रवासी अंगावर खराब पाणी उडाल्याने त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे, अशी मागणी आता प्रवासी करत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.