Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंना सभेआधी पोलिसांनी नोटीस दिलीय का? गृहमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर!

Raj Thackeray aurangabad sabha : 'कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, अशी अपेक्षा आहे आणि घडलंच तर त्याला सामोरं जायलाही पोलीस सक्षम आहेत.'

Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंना सभेआधी पोलिसांनी नोटीस दिलीय का? गृहमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर!
नेमकं काय म्हणाले वळसे पाटील?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 9:36 AM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Aurangabad Speech) यांची औरंगाबादेत सभा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत जय्यत तयारी करण्यात आलीय. शेकडो मनसैनिक या सभेसाठी औरंगाबादेत दाखलही झाले. आज संध्याकाळी होणाऱ्या या सभेकडे सगळ्यांचीच नजर लागलीय. दरम्यान, सभेआधी परवानगी देण्यावरुन राजकारण रंगलं होतं. अखेर औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) मनसेच्या या सभेला परवानगी दिली. त्यानंतर आता पुण्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रकारांनी राज ठाकरेंच्या सभेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी एका वाक्यात उत्तर देऊन प्रश्न निकाली काढलाय. महाराष्ट्र दिनी राजकीय सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे मनसेची तर दुसरीकडे भाजपचीही सभा पार पडणार आहे. राजकीय सभांच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री?

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना राजकीय सभांचं आयोजन आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर बोलताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलंय, की…

राजकीय सभा आणि राजकीय कार्य़क्रम लोकशाहीत चालत राहणार. कायदा सुव्यवस्था शांतता ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असते. त्यासाठी पोलीस सज्ज आहेत. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, अशी अपेक्षा आहे आणि घडलंच तर त्याला सामोरं जायलाही पोलीस सक्षम आहेत.

राज ठाकरेंना सभेआधीच नोटीस?

दरम्यान, राज ठाकरेंना सभेआधीच नोटीस देण्यात आली आहे का, असाही प्रश्न यावेळी वळसे पाटील यांना उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना वळसे पाटील यांनी एका वाक्यात उत्तर देत म्हटलंय की, राज ठाकरेंना परवानगी दिली, तेव्हा ती अटी आणि शर्थीसह दिलेली आहे. याचाच अर्थ सभेआधी राज ठाकरेंना आज कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांकडून राज ठाकरेंना सभेसाठी तीन महत्त्वाच्या अटी पाळाव्या लागणार आहेत. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. या तीन अटी नेमक्या कोणत्या आहेत, त्यावरही एक नजर टाकुयात…

असा आहेत अटी!

  1. पहिली अट : सभेवेळी वापरण्यात येणारे ध्वनीक्षेपक बाबत सर्वोच्चे न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करने बंधनकारक असेल. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रात 75 डेसीबल, व्यापारी क्षेत्रात, 65 डेसीबल, निवासी क्षेत्रात 55 डेसीबल, आणि शांतता क्षेत्रात 50 डेसीबल. आता राज ठाकरे बोलोयला उभा राहिले की त्यांनी आवाजी मर्यादा कोणत्या आधारे पाळायची हाही एक प्रश्नच आहे. कारण राज ठाकरेंचा धडाडणारा आवाज आहे, म्हणूनच त्यांना धडडणारी तोफ म्हणलं जातं.
  2. दुसरी अट : फक्त 15 हजार लोकांना बोलवता येणार आहे. मात्र राज ठाकरेंची सभा म्हटलं की मैदानं तुडुंब भरतात. तसेच परराज्यातून जसे की आयोध्येतूनही काही हजारांमध्ये लोक या सभेसाठी येणार आहेत. अशा वेळी ही मर्यादा पाळणे हेही आव्हान असणार आहे.
  3. तिसरी अट :जातीय तेढ निर्माण होऊ नये आणि प्रक्षोभक भाषण होऊ नये, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या सभेला अनेक संघटनांनी विरोध केला होता, राज ठाकरे यांच्या भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल असा आरोप या संघटनांकडून करण्यात आला होता. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, धर्म, भाषा, वर्ण, प्रदेश जन्मस्थान, धर्म यावरून चिथावणीखोर वक्तव्य करू नये, असे सांगण्यात आले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.