माझे बोलणे झाले ना, मग विषय संपला…मी कधी स्पष्टीकरण करत नाही…राज ठाकरे यांनी टोचले राजकारण्यांचे कान

mns leader raj thackeray speech: राजकारण्यांना योग्य वेळी ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत काही वर्षांपूर्वी होती. ती आज मला कमी दिसते. आजचा महाराष्ट्राचा झालेला सर्व खेळ पाहता महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदूषकी चाळे करत आहे, कोणी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारत आहेत.

माझे बोलणे झाले ना, मग विषय संपला...मी कधी स्पष्टीकरण करत नाही...राज ठाकरे यांनी टोचले राजकारण्यांचे कान
raj thackeray speech
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 12:21 PM

मनसे नेते राज ठाकरे यांनी पुण्यातून आजच्या राजकारण्यांना शालजोडीतले टोमणे मारले. महाराष्ट्रातील आजचे राजकारण पाहिल्यावर भविष्यात राजकारणात कोणी येणार नाही. तसेच या राजकारण्यांना सुधारण्याची जबाबदारी साहित्यिकांनी घ्यावी, त्यांना वेळप्रसंगी चार खडेबोल सुनवावे, अशी विनंती केली. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८ वे साहित्य संमेलन फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत होत आहे. त्या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण राज ठाकरे यांच्या उपस्थित झाले. त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले राज ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या पद्धतीची भाषा बोलली जात आहे. ज्या पद्धतीच्या गोष्टी केल्या जात आहेत, तेथे त्या राजकारण्यांना कान धरुन शिकवणे, सांगणे आणि जमिनीवर आणणे हे साहित्यिकांचे सर्वात मोठे काम आहे. तुमच्याकडे तो अधिकार आहे. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता. तुम्ही बोलताना कधी ट्रोलचा विचार करु नका. मी आजपर्यंत जी भाषणे दिली आहेत, ज्या मुलाखती दिल्या आहेत, त्या पुन्हा कधी वाचत नाही. माझे बोलून झाले ना विषय संपला. मी कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण करण्यास जात नाही. मी अब्राहिम लिंकन यांचे एक वाक्य मला आवडते. ते म्हणाले होते, कधीही स्पष्टीकरण करण्यास जावू नका. कारण जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते कधी स्पष्टीकरण मागत नाही. जे तुमचा द्वेष करतात ते तुमचे स्पष्टीकरण ऐकत नाही.

भविष्यात कोणी राजकारण येणार नाही…

साहित्यिकांनी आताचा महाराष्ट्र पाहिल्यावर राजकारण्यांना चार खडे बोल सुनावण्याचे काम करावे. कारण आज राजकीय भाषा खालच्या स्तरावर गेली आहे. त्या राजकारण्यांना समजवणारे कोणी नाही. ज्यांना ज्येष्ठ म्हणावे, तेच त्यांचा आहारी लागले आहे. आता साहित्यिकांनी त्यांना सुधारण्याची जबाबदारी हाती घ्यावी. त्यासाठी एक सामाजिक चळवळ उभी करावी. सध्याच्या राजकारण्यातील भाषापाहून भविष्यात कोणी राजकारणात येणार नाही.

हे सुद्धा वाचा

ती धमक अन् हिंमत तुमच्यात आहे…

राजकारण्यांना योग्य वेळी ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत काही वर्षांपूर्वी होती. ती आज मला कमी दिसते. आजचा महाराष्ट्राचा झालेला सर्व खेळ पाहता महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदूषकी चाळे करत आहे, कोणी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात अनेक लोक आहे, त्यांना जाळ्यांशिवाय इमारतींवर उड्या मारायला लावले पाहिजे.

राज ठाकरे यांनी म्हटले साहित्यिकांसमोर आपण काय बोलावे. आम्ही त्यांची भाषा वाचून पुढे जातो. त्यामुळे त्यांच्यासमोर आपण बोलयचे नसते. आपण ऐकायचे असते. त्यामुळे आज सर्वात छोटे भाषण मी करणार आहे, असे सुरुवातीलच स्पष्ट केले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.